50 एअर होस्टेस पोहोचल्या भरचौकात अन् त्यांनी कपडेच उतरवायला सुरुवात केली

Air Hostesses
Air Hostessesesakal
Updated on
Summary

आतापर्यंत तुम्ही एअर होस्टेसना विमानात सुंदर कपडे घालून प्रवासाचे नियम आणि कायदे सांगताना पाहिलं असेल; पण..

इटली : आतापर्यंत तुम्ही एअर होस्टेसना (Air Hostesses) विमानात सुंदर कपडे घालून प्रवासाचे नियम आणि कायदे सांगताना पाहिलं असेल; पण इटलीतील (Italy) रोममध्ये (Rome) लोकांनी जेव्हा एअर होस्टेसना भररस्त्यात कपडे काढताना पाहिलं, तेव्हा त्यांना खूप आश्चर्य वाटलं. रोममध्ये जवळ-जवळ 50 एअर होस्टेस ग्रुप करुन पोहचल्या आणि त्यांनी शांतपणे एक-एक करून आपली कपडे उतरवण्यास सुरुवात केली. हे पाहून काही काळ रस्त्यावर ये-जा करणारे लोक गोंधळात पडले. नेमका काय प्रकार सुरु आहे, हे त्यांना समजत नव्हेत. लोकांनी त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या निशब्द झाल्या.

Air Hostesses
भारतीय वंशाच्या महिलेला अमेरिकेच्या White House मध्ये मोठी जबाबदारी

या एअर होस्टेस इटलीच्या राष्ट्रीय विमान कंपनीत कार्यरत आहेत. कंपनीच्या विरोधात त्यांनी आंदोलनाचं पाऊल उचललंय. ITA Airways मधील पगार कपातीबद्दल त्यांनी निषेध व्यक्त केलाय. सरकारसमोर आपला राग व्यक्त करण्यासाठी त्यांनी इथल्या रस्त्यावर आपला गणवेश उतरवत कंपनीचा निषेध नोंदवलाय. एअर होस्टेस सांगतात, ITA Airways मेहनत आणि समर्पणाच्या बळावर यशाची शिखरं गाठत आहे, पण कंपनी एअर होस्टेसवर अन्याय करताना दिसतेय. कंपनीनं या आठवड्यात फ्लाइट अटेंडंटला कामावरून काढून टाकल्याच्या निषेधार्थ आम्ही आंदोलनाचा निर्णय घेतलाय. आमचा राग व्यक्त करण्यासाठी आम्ही सर्वजण कंपनीचे गणवेश परिधान करून चौकाचौकात उभ्या राहिलो आणि नंतर आम्ही कपडे काढून फक्त अंडरगारमेंटमध्येच उभ्या राहून कंपनीचा निषेध नोंदवला. या एअर होस्टेसनी पूर्वी अलितालिया एअरलाइन्समध्ये Alitalia Airlines काम केलं होतं, आता त्यांना ITA Airways कंपनीनं कामावर घेतलंय, परंतु त्यांच्या पगारात कपात करण्यात आलीय. शिवाय, अनेक पदोन्नती देखील खोळंबल्या आहेत.

Air Hostesses
तालिबान्यांनी केलेल्या गोळीबारात 17 नागरिक ठार

भररस्त्यात एअर होस्टेसनी शांतपणे त्यांचा गणवेश उतरवला आणि ‘आम्ही सर्व Alitalia आहे’ असा नारा दिला. नवीन एअरलाइन्सनंतर अलितालियाच्या कर्मचाऱ्यांना दुसऱ्या दर्जाची वागणूक दिली जात असल्याचा आरोप या एअर होस्टेसनी केलाय. यापूर्वी एअरलाइन्स अंतर्गत 110 विमानं कार्यरत होती, ज्यात 10 हजार लोकांची टीम काम करत होती. मात्र, आता नवीन ITA एअरवेज अंतर्गत फक्त 52 विमानं कार्यरत आहेत आणि त्यात फक्त 2800 लोकांचीच गरज आहे. अशा परिस्थितीत अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, तर काहींना कमी पगारावर कामावर घेतलं जातंय.

Air Hostesses
जगातील मुस्लिमांसह भारतातील मुसलमान पाकिस्तानी संघासोबत होते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()