Tricolour outside White House : मोदींच्या दौऱ्यापूर्वी व्हाईट हाऊसबाहेर डौलाने फडकला तिरंगा!

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढील आठवड्यात अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत.
Tricolour outside White House
Tricolour outside White HouseeSakal
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढील आठवड्यात अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यापूर्वी व्हाईट हाऊसच्या बाहेर भारताचा आणि अमेरिकेचा राष्ट्रध्वज एकत्र फडकवण्यात आला आहे. याबाबत अमेरिकेतील भारतीयांनी आनंद व्यक्त केला आहे.

या दोन ध्वजांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. व्हाईट हाऊसच्या बाहेरील स्तंभांवर हे ध्वज लावण्यात आले आहेत. 'व्हाईट हाऊसच्या बाहेर मुक्तपणे आपला तिरंगा फडकताना पाहणे ही अगदी अभिमानाची आणि गर्वाची बाब आहे. मी अमेरिकेत कामासाठी फिरत असताना तिरंगा घेऊनच फिरतो' असं मत अमेरिकेतील एका भारतीयाने व्यक्त केलं.

Tricolour outside White House
Drone Deal : मोदींच्या दौऱ्यापूर्वी ड्रोन डीलसाठी अमेरिका आग्रही? बायडेन सरकार दबाव आणत असल्याची चर्चा

असा असेल दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्याचे वेळापत्रक समोर आले आहे. ते २१ जून रोजी न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्र मुख्यालयात योग दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. यानंतर, २२ जून रोजी व्हाईट हाऊसमध्ये त्यांचे औपचारिक स्वागत केले जाईल. याच दिवशी पंतप्रधान मोदींच्या सन्मानार्थ स्टेट डिनरचे आयोजन करण्यात येणार आहे. यानंतर, २३ जून रोजी पंतप्रधान मोदी एका सार्वजनिक कार्यक्रमात अमेरिकेतील भारतीय समुदायाला संबोधित करतील.

Tricolour outside White House
PM Modi Yoga : योगदिनाच्या आधीच आला पंतप्रधान मोदींचा खास Video; आसनांचे दाखवले प्रात्यक्षिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.