''सर्वाधिक दीर्घकालीन युद्धाचा शेवट''; अफगाणिस्तानातून सैन्यमाघारीची अमेरिकेची घोषणा

अफगाणिस्तानातील युद्ध ‘पिढ्यानुपिढ्या’ चालावे, असे काही ठरवले नव्हते. आमच्या सैनिकांनी घरी परतण्याची वेळ आली आहे, असे म्हणत अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी ११ सप्टेंबरपूर्वी अफगाणिस्तानातून संपूर्ण सैन्यमाघारी घेण्याची घोषणा केली.
joe biden
joe bidenSakal Media
Updated on

वॉशिंग्टन- अफगाणिस्तानातील युद्ध ‘पिढ्यानुपिढ्या’ चालावे, असे काही ठरवले नव्हते. आमच्या सैनिकांनी घरी परतण्याची वेळ आली आहे, असे म्हणत अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी ११ सप्टेंबरपूर्वी अफगाणिस्तानातून संपूर्ण सैन्यमाघारी घेण्याची घोषणा केली. यामुळे अमेरिकेने पुकारलेल्या या आतापर्यंतच्या सर्वाधिक दीर्घकालीन युद्धाची पाच महिन्यांमध्ये अखेर होणार आहे. अफगाणिस्तातून सैन्यमाघारी घेण्याची घोषणा माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती. त्यानुसार सैन्यमाघारीची प्रक्रिया सुरूही झाली आहे. सध्या अफगाणिस्तानात अमेरिकेचे सुमारे अडीच हजार सैनिक आहेत.

बायडेन यांनी दूरचित्रवाणीच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. ते म्हणाले,‘‘एकाच देशावर लक्ष केंद्रित करून हजारो सैनिकांना युद्धभूमीवर तैनात करणे आणि त्यासाठी दरवर्षी अब्जावधी डॉलर खर्च करणे, हा प्रकार अतार्किक आहे. त्यामुळे अमेरिकेचे हे दीर्घकालीन युद्ध संपविण्याची वेळ आली आहे. येत्या एक मेपासून सैन्यमाघारीची अंतिम प्रक्रिया अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने सुरु होईल. अमेरिकेवरील दहशतवादी हल्ल्याला वीस वर्षे पूर्ण होत असताना अमेरिकेचे, नाटोमधील सदस्य देशांचे आणि इतर मित्र देशांचे सैन्य अफगाणिस्तानबाहेर असेल.’’

joe biden
भारतातील घटनांवर अमेरिका गप्प का ? राहुल गांधींनी केली तक्रार

अल कायदा या दहशतवादी संघटनेने ११ सप्टेंबर २००१ ला अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर दहशतवादी हल्ला केला होता. त्यानंतर अल कायदाचा नायनाट करण्याच्या उद्देशाने अमेरिकेचे सैन्य अफगाणिस्तानात उतरले होते. आताही अफगाणिस्तानात शांततेचे वातावरण नसल्याने अमेरिकेच्या सैन्यमाघारीवर चर्चा होत आहे. मात्र, अफगाणिस्तान सरकारबरोबर आम्ही चर्चा केली असून दहशतवाद्यांचा अमेरिकेला त्रास होणार नाही, याची आम्ही काळजी घेतली आहे, असे बायडेन प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

युद्धातील अमेरिकेचे नुकसान

अफगाणिस्तानातील युद्धात अमेरिकेचे एक हजार अब्जाहून अधिक डॉलर खर्च झाले. या वीस वर्षांत अमेरिकेचे २४५० सैनिक दहशतवादी हल्ल्यात मारले गेले, तर २०,७०० सैनिक जखमी झाले.

joe biden
अग्रलेख : अमेरिकी नामुष्कीचे स्वगत

ते आमचे काम नाही : बायडेन

सैन्यमाघारीबाबत बायडेन यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. ‘ओसामा बिन लादेनला मारणे आणि दहशतवाद्यांची आश्रयस्थाने नष्ट करणे, या दोन कारणांसाठी आम्ही अफगाणिस्तानात गेलो होतो. आमच्यावर हल्ला झाला होता. हल्ला करणाऱ्यांना मारण्यास आम्ही गेलो होतो. आमचे उद्दिष्ट पूर्ण झाले. हे युद्ध पिढ्यानुपिढ्या चालावे, अशी आमची कधीही योजना नव्हती. अफगाणिस्तानमध्ये राजकीय स्थैर्य निर्माण करणे, हे आमचे काम कधीच नव्हते. आता तालिबानबरोबर लढत बसण्यापेक्षा आमच्या देशासमोर असलेल्या प्रश्‍नांचा सामना करणे आम्हाला अधिक आवश्‍यक वाटते. आम्ही जगभरात पसरलेले दहशतवादाचे जाळे नष्ट करण्यासाठी काम करू,’ असे बायडेन यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.