रशियानं युक्रेनवर आक्रमण केले असून सध्या दोन्ही देशांमध्ये युद्ध (Ukraine Russia War) सुरू आहे. या युद्धाचा अमेरिकेने तीव्र निषेध केला आहे. आता अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांच्यावर निशाणा साधला आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladirmir Putin) हे हुशार आहेत ही समस्या नाही. पण आमचे नेते मूर्ख आहेत, असं ट्रम्प म्हणाले.
सध्या ट्रम्प चर्चेत दिसत नाहीत. पण, रशिया-युक्रेन युद्धाच्या निमित्ताने ते पुन्हा चर्चेत आलेत. फ्लोरिडा येथे वार्षिक कंझर्व्हेटिव्ह पॉलिटिकल अॅक्शन कॉन्फरन्समध्ये त्यांनी बायडन आणि नाटाोवर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी २०२० च्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीत मतांची चोरी झाल्याचा खोट्या दाव्यांचा पुनरुच्चार केला. तसेच त्यांनी डाव्या पक्षांवर हल्ला देखील चढवला.
रशियाने युक्रेनवर हल्ला केला. राजधानी कीव्हमध्ये स्फोट घडवून आणले. तरी ट्रम्प यांनी व्लादिमीर पुतीन यांच्या शहाणपणाचे कौतुक केले. तर युक्रेनवरील रशियाच्या हल्ल्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचा कमकुवतपणा जबाबदार असल्याचं ट्रम्प म्हणाले. आमच्या निवडणुकीत मतांची हेराफेरी झाली नसती तर ही भयंकर आपत्ती कधीच ओढवली नसती, असं ट्रम्प म्हणाले. रशियाला मानसिकदृष्ट्या कमजोर करण्याऐवजी नाटोने रशियावर आर्थित निर्बंधाचा लावण्याचा विचार केला. पुतीन हुशार आहेत ही समस्या नाही, तर आमचे नेते खूप मूर्ख आहेत ही समस्या आहे, असंही ट्रम्प म्हणाले.
युक्रेनवर रशियाचा हल्ला भयावह आहे. हा एक आक्रोश आणि अत्याचार आहे जो कधीही झाला नसावा. आम्ही युक्रेनच्या लोकांसाठी प्रार्थना करत आहोत, असे म्हणत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदमिर झेलेन्स्की हे धाडसी असल्याचं ट्रम्प म्हणाले. पण, यावेळी त्यांनी व्लादिमीर पुतीन यांच्यासोबत असलेले मैत्रीपूर्ण संबंध देखील अधोरिखीत केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.