Coronavirus : अमेरिकेत 'ट्रम्प डेथ क्लॉक'ची चर्चा; काय आहे प्रकरण?

Trump Death Clock in New Yorks Times Square counts preventable US coronavirus deaths
Trump Death Clock in New Yorks Times Square counts preventable US coronavirus deaths
Updated on

नवी दिल्ली : जगाच्या तुलनेत अमेरिकेत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशात अमेरिकेत कोरोना व्हायरसच्या वाढत्या रुग्णांसोबत 'ट्रम्प डेथ क्लॉक'ची चर्चा सुरू आहे. न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवर ट्रम्प डेथ क्लॉक लिहिलेला डिजीटल बिलबोर्ड लावण्यात आला आहे. या बिलबोर्डवर सरकारी निष्काळजीपणामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या लावण्यात आली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ट्रम्प डेथ क्लॉकनुसार सोमवारपर्यंत ४८ हजारांपेक्षा जास्त जणांचा सरकारच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं आहे. कोरोनामुळे खाली झालेल्या टाईम्स स्क्वेअर बिल्डिंगच्या सगळ्यात उंच ठिकाणी हा बिलबोर्ड लावण्यात आला आहे. अमेरिकेमध्ये कोरोनामुळे ८० हजारांपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. ट्रम्प यांनी वेळेत उपाययोजना केल्या असत्या तर यापेक्षा अर्ध्या जणांचा मृत्यू झाला असता, असे बोर्ड लावताना म्हटले आहे.

कोणी लावला हा बोर्ड?
हा बोर्ड चित्रपट निर्माते यूजीन जेर्की यांनी डिझाईन केला आहे. चित्रपट निर्माते यूजीन जेर्की यांनी २ वेळा सनडान्स फिल्म फेस्टिवलमध्ये पुरस्कार पटकावला आहे. 

जर्की यांचे काय आहे म्हणणे?
ट्रम्प यांनी योग्यवेळी योग्य निर्णय घेतले असते, तर अनेकांचे जीव वाचले असते, असं यूजीन जेर्की म्हणाले आहेत. १६ मार्चऐवजी ९ मार्चलाच ट्रम्प यांनी सोशल डिस्टन्सिंग अनिवार्य केलं असतं आणि शाळा बंद केल्या असत्या तर ६० टक्के मृत्यू रोखता आले असते, असं जेर्की म्हणाले. अमेरिकेतले संसर्गजन्य रोगातील तज्ज्ञ एंथनी फौसी यांच्या संशोधनाचा दाखला यूजीन जेर्की यांनी यावेळी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.