वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी एच१बी व्हिसाबाबत मोठा निर्णय घेतला असून एच१बी व्हिसावर २०२०च्या अखेरपर्यंत निर्बंध घातले आहेत. याबाबत त्यांनी सोमवारी अधिकृत घोषणा केली आहे. २४ जूनपासून हा आदेश लागू होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
कोरोना विषाणूंच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अमेरिकेला मोठा फटका बसला असून लाखो जणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे अमेरिकी लोकांना प्राधान्य देण्यासाठी आणि त्यांच्या मदतीसाठी ट्रम्प प्रशासनाकडून हे पाऊल उचलण्यात आलं आहे. आता अमेरिकेतील स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही ट्रम्प प्रशासनाकडून यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे.
-----------
अखेर चीनकडून सैन्य मारले गेल्याची कबुली
-----------
एच१बी व्हिसावर निर्बंध आणल्यामुळे अमेरिकेत जायचं स्वप्न बघणाऱ्या भारतीयांना मात्र आता मोठा झटका बसला आहे. भारतातून मोठ्या संख्येने आयटी प्रोफेशनल एच१बी व्हिसा घेऊन अमेरिकेत जातात. याचा फटका अनेक भारतीय आणि अमेरिकी कंपन्यांनाही बसेल, ज्या कंपन्यांना १ ऑक्टोबरपासून सुरू होत असलेल्या आर्थिक वर्ष २०२१साठी अमेरिकी सरकारकडून एच१बी व्हिसा जारी करण्यात आले होते त्यांना याचा फटका बसणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
कोरोनच्या संकटामुळे अमेरिकेत वाढत्या बेरोजगारी वाढण्याचे संकेत आहेत. या पार्श्वभूमीवर एच१बी व्हिसावर निर्बंध आणण्याची मागणी स्थानिक स्तरावर मोठ्या प्रमाणात होत होती. त्यानुसार ट्रम्प प्रशासनाने एच१बी व्हिसासह अन्य अनेक श्रेणीतील व्हिसासाठीही निर्बंध आणले आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.