Killing Of Stray Dogs: तब्बल ४० लाख कुत्र्यांची सरकार करणार हत्या? कुठे घडतो आहे प्रकार? घ्या जाणून

Latest Global News: या नव्या कायद्यामुळे कुत्र्यांना ठार केले जाईल किंवा निर्जन स्थळी ठेवली जाईल
 तब्बल ४० लाख कुत्र्यांची सरकार करणार हत्या? कुठे घडतो आहे प्रकार? घ्या जाणून
Killing Of Stray Dogssakal
Updated on

Turkey: भटक्या कुत्र्यांशी संख्या तब्बल ४० लाख आहे. या कुत्र्यांमुळे सामान्यांना रस्त्यांवरून चालणे मुश्‍कील झाले आहे. यासाठी तुर्किये सरकारने मंगळवारी एक कायदा केला आहे. या कायद्याने अनेक कुत्र्यांना ठार करण्याची भीती असल्याने आंदोलन सुरू झाले आहे.

भटक्या कुत्र्यांच्या त्रास थांबविण्यासाठी तुर्कियेच्या ‘द ग्रँड नॅशनल असेंब्ली’त सदस्यांनी काल रात्रीत यासंबंधीचे विधेयक मंजूर केले आहे. हे विधेयक उन्हाळ्याच्या सुट्टीपूर्वी मंजूर करावे यासाठी सरकारने जोर दिला होता, असे वृत्त ‘द टाईम्स’ने दिले आहे. या नव्या कायद्यामुळे कुत्र्यांना ठार केले जाईल किंवा निर्जन स्थळी ठेवली जाईल, अशी भीती पशुप्रेमींनी व्यक्त केली आहे.

 तब्बल ४० लाख कुत्र्यांची सरकार करणार हत्या? कुठे घडतो आहे प्रकार? घ्या जाणून
Lost Dog Maharaj : पांडुरंगानेच दाखवली वाट... वारीत हरवलेला 'महाराज' २५० किमीचा प्रवास करून परतला घरी; गावाने काढली मिरवणूक

या कायद्याविरोधात देशभर निषेध व्यक्त होत असून इस्तंबूल, अंकारा येथे हजारो लोक रस्त्यावर उतरले आहेत. भटक्या कुत्र्यांना मारण्याची परवानगी देणारे कलम कायद्यातून हटविण्याची मागणी आंदोलक करीत आहेत. विरोधी सदस्य, प्राणीप्रेमी संघटना आणि अन्य लोकांनी हा कायदा कुत्र्यांचा सामूहिक संहार करणारा असल्याचे म्हटले आहे.

आजारी कुत्र्यांना मारणार

कायद्यानुसार महानगरपालिकांना भटक्या कुत्र्यांना गोळा करून निवारा केंद्रात ठेवण्याची तसेच त्यांचे पालकत्व देण्यापूर्वी त्यांची नसबंदी करणे, लसीकरण करण्याची सूचना करण्यात आली आहे. जी कुत्री गंभीर आजारी आहेत, ज्यांना वेदना होत आहेत किंवा ज्या कुत्र्यांमुळे लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असेल तर त्यांना ठार करण्याचे निर्देशही दिले आहेत.

 तब्बल ४० लाख कुत्र्यांची सरकार करणार हत्या? कुठे घडतो आहे प्रकार? घ्या जाणून
Overfeeding Pet Dog : पाळीव प्राण्यांना अतिखाऊ घालताय? सावधान!कुत्र्याच्या मालकीणीला झालाय तुरूंगवास...काय घडलं नेमकं ?

राजकीय वापराचीही शक्यता

कुत्र्यांसाठी केलेल्या या कायद्याचा वापर राजकीय विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी विशेषतः: स्थानिक निवडणुकांमध्ये विरोधकांनी लक्षणीय यश मिळवल्यानंतर केला जाऊ शकतो, अशी शक्यता काही राजकीय समीक्षकांनी व्यक्त केली आहे. कारण या कायद्याचे पालन न करणाऱ्या महापौरांना दंड करण्याची तरतूद याच आहे. या कायद्याची अंमलबजावणी न करण्याचा निश्‍चय मुख्य विरोधी पक्षाने केला आहे. या विधेयकाचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी समर्थन दिलेल्या सदस्यांचे तुर्कियेचे अध्यक्ष रेसेप तैय्यिप एर्देगॉन यांनी आभार मानले आहेत.

 तब्बल ४० लाख कुत्र्यांची सरकार करणार हत्या? कुठे घडतो आहे प्रकार? घ्या जाणून
Nanded Dog Bite Case : तामसा शहरात खळबळ! पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला दहा जणांना चावा; नागरिकांत भितीचे वातावरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.