अंकारा - येथील संरक्षण कंपनी तुर्किए एरोस्पेस कंपनीच्या मुख्यालयावर कुर्दिश दहशतवाद्यांनी बुधवारी आत्मघातकी हल्ला केल्यानंतर तुर्किएने काही वेळातच दहशतवाद्यांविरोधात मोठी मोहीम उघडली. तुर्किएच्या हवाई दलाने इराक आणि सीरियात हल्ले केले. या हल्ल्यात कुर्दिश दहशतवाद्यांची किमान तीसपेक्षा अधिक ठिकाणं नष्ट झाली.