Turkey Earthquake : तुर्कीतच सारखे भूकंप का होतात? जाणून घ्या धक्कादायक कारण

तुर्कीच्या इतिहासात दुसऱ्यांदा सगळ्यात तीव्रतेचा भूकंप आला आहे. मागच्या २४ वर्षांमध्ये भूकंपामुळे तुर्कीत १८ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.
Turkey Earthquake
Turkey Earthquakeesakal
Updated on

Turkey Earthquake : तुर्कीत ६ फेब्रुवारी २०२३ च्या पहाटे ७.८ तीव्रतेचा भूकंप आला. यात मोठ्यासंख्येत हानी झाली आहे. तुर्कीच्या इतिहासात दुसऱ्यांदा सगळ्यात तीव्रतेचा भूकंप आला आहे. मागच्या २४ वर्षांमध्ये भूकंपामुळे तुर्कीत १८ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. या भूकंपानंतर ७.५ तीव्रतेचा दुसरा मोठा भूकंप आला. या दोन्ही भूकंपांनी तुर्की आणि सीरियाला ६ वेळा जोर जोरात हलवलं. सगळ्यात मोठी झटका ४० सेकंद तरी जाणवला. यामुळे खूप मोठी हानी झाली. यामागचं कारण काय जाणून घेऊया.

तुर्की चार टेक्टोनिक प्लेटांच्या जंक्शनवर वसलेलं आहे. त्यामुळे कोणत्याही प्लेटमध्ये जराही हालचाल झाली तर संपूर्ण क्षेत्र हलते. तुर्कीचा बहुतांश भाग एनाटोलियन प्लेट (Anatolian Plate) वर आहे. एनाटोलियनचा अर्थ आहे छोटा एशिया. या प्लेटच्या पूर्वेला इस्ट एनाटोलियन फ्लॉट आहे. डावीकडे ट्रांसफॉर्म फॉल्ट आहे. जो अरेबियन प्लेटशी जोडलेला आहे. दक्षिण आणि दक्षिण-पश्चिम मध्ये अफ्रीकन प्लेट आहे. तर उत्तर दिशेला युरेशियन प्लेट आहे. जी उत्तरी एनाटोलियन फॉल्ट झोनशी जोडलेला आहे.

Turkey Earthquake
Turkey Earthquake : तुर्कीच्या भूकंपात हजारो ठार, लक्षात ठेवा मोठ्या भूकंपावेळी काय करावं अन् काय नाही

अँटीक्लॉक फिरते एनाटोलियन टेक्टोनिक प्लेट

तुर्कीच्या खाली असणारी एनाटोलियन टेक्टोनिक प्लेट घड्याळाच्या उलट्या दिशेला म्हणजे अँटीक्लॉक वाइज फिरत आहे. सोबतच अरेबियन प्लेटला धक्का देत आहे. जेव्हा ही फिरणारी एनाटोलियन प्लेट अरेबियन प्लेटला धक्का देते तेव्हा ही युरेशियन प्लेटला धडकते. त्यावेळी भूकंपाचे जोरदार धक्के बसतात.

Turkey Earthquake
Turkey Earthquake : तुर्की-सीरियात भूकंपामुळे हाहाकार; 3400 हून अधिक मृत्यू; भारतातून NDRF टीम रवाना

याविषयी ही पण थेअरी आहे की, एनाटोलियन टेक्टेनिक प्लेट जमीनीच्या क्रस्टचा तो एक तरंगता तुकडा आहे. उत्तरी एनाटोलियन प्लेटचा अभ्यास केल्यावर समोर आलं की, ती एनाटोलिया यूरेशियन प्लेट पासून वेगळी झालेली आहे. आता याला अरेबियन प्लेट दाबत आहे. तर युरेशियन प्लेट या दबावाला थांबवत आहे. अफ्रीकन प्लेट सतत एनाटोलियन प्लेटच्या खाली धसत जात आहे. या नैसर्गिक घटना साइप्रसच्या खाली होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.