Turkey Earthquake : तुर्की-सीरियात भूकंपामुळे हाहाकार; 3400 हून अधिक मृत्यू; भारतातून NDRF टीम रवाना

Turkey Earthquake Update
Turkey Earthquake Update
Updated on

Turkey Earthquake Update : भूकंपामुळे तुर्कस्तान आणि सीरियासह चार देशांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तुर्कस्तानमधील नुर्दगीपासून 23 किमी पूर्वेला भूकंपाचे धक्के जाणवले. याचा परिणाम सीरियापर्यंत दिसून आला.

भूकंपामुळे देशभरातील अनेक इमारती कोसळल्या. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.8 इतकी मोजली गेली. या भूकंपानंतर शेकडो लोक अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले असून अनेक बेपत्ता आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. यादरम्यान तुर्कीमध्ये सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तुर्की आणि सीरियामध्ये किमान 3400 लोकांचा मृत्यू झाला असून 15000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. 10 शहरांमधील 1,700 हून अधिक इमारतींचे नुकसान झाले, असे रिपोर्टमध्ये देशाचे उपाध्यक्ष फिएट ओकटे यांचा हवाला देत सांगण्यात आले आहे. त्याच वेळी, सीरियामध्ये किमान 783 लोक मारले गेले आणि 639 जखमी झाले. इस्रायल आणि लेबनॉनमध्येही अनेक मृत्यूची भीती व्यक्त केली जात आहे.

भारताकडून मदत..

भारताने तुर्कीला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. त्याअंतर्गत एनडीआरएफची टीम आणि विशेष प्रशिक्षित श्वान पथक तुर्कीला पाठवण्यात आले.

डेप्युटी कमांडंट दीपक तलवार यांनी सांगितले की की, टीममध्ये 47 एनडीआरएफ जवान आणि वरिष्ठ अधिकारी आहेत जे संयुक्त राष्ट्रांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार काम करतात. आम्हाला दोन टीम पाठवण्याच्या सूचना मिळाल्या आहेत. पहिली टीम निघणार आहे आणि दुसरी टीम सकाळी निघणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.