Turkey Earthquake Update : तुर्कीमध्ये आज सकाळी बसलेल्या भीषण भूकंपामध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर पुन्हा एकदा तुर्की आणखी एका मोठ्या भूकंपाच्या धक्क्याने हादरले आहे.
हेही वाचा : ढोलेरा- ग्रीनफिल्ड सिटी आणि महाप्रचंड औद्योगिक हब...
यानंतर येथे मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असतानाच पुन्हा एकदा तुर्कीमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के बसले आहेत. या भूकंपाची तीव्रता ७.६ रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली असून कहरामनमारा प्रांतातील एल्बिस्तान जिल्ह्यात हे धक्के बसल्याचे सांगितले जात आहे.
आज सकाळी बसलेल्या भीषण भूकंपात आतापर्यंत १३०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून, पाच हजारांहून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. सध्या मोठ्या प्रमाणावर बचाव आणि मदतकार्य सुरू असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भारताने पुढे केला मदतीचा हात
भीषण भूकंपाच्या धक्क्यानंतर तुर्कीतील जनजीवन विस्कळीत झालेले असतानाच भारताने तुर्की आणि सीरियाला मदतीसाठी हात पुढे केला आहे.
सोमवारी पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत तुर्कीला मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार तुर्की सरकारच्या समन्वयाने एनडीआरएफ आणि वैद्यकीय पथके मदत सामग्रीसह पाठवण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.
यामध्ये प्रशिक्षित श्वानपथकासह 100 कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या दोन NDRF पथके आणि विशेष बचाव पथकातील आवश्यक उपकरणे भूकंपग्रस्त भागात पाठवली जाणार आहेत.
याशिवाय वैद्यकीय पथके प्रशिक्षित डॉक्टर आणि पॅरामेडिकल स्टाफसह आवश्यक औषधेदेखील तुर्की आणि सीरियाला भारताकडून पाठवली जाणार आहेत. भारतासह रशियानेदेखील तुर्कीला मदत जाहीर केली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.