Rahul Gandhi : तुर्कीत एर्दोगन यांचे विरोधक कमाल यांची राहुल गांधींशी होतेय तुलना; जाणून घ्या कारण

turkey presidential election similarities in condition of opposition in india congress rahul gandhi and chp kemal
turkey presidential election similarities in condition of opposition in india congress rahul gandhi and chp kemal
Updated on

आशिया खंडातील दोनदेश तुर्की आणि भारत यांच्यात बरेच साधर्म्य पाहायला मिळता. विशेषतः सध्या राजकीय वातावरण आणि नेत्यांच्या वर्तवणूकीत तर मोठ्या प्रमाणात सारखेपणा दिसून येतो. या दोन्ही देशातील विरोधी पक्षातील नेत्यांची देखील तुलना केली जात आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते अनेक वर्षांपासून तुर्कीचे राष्ट्रपती रेचेप तैय्यर एर्दोगन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कार्यपद्धत, त्यांना मिळणारा राजकीय पाठिंबा यासारख्या गोष्टींमध्ये साधर्म्य दिसून येते. अगदी तुर्कीचा सत्ताधारी जस्टीस एंड डेव्हलपमेंट पक्ष, ज्याला एके पार्टी म्हणूनही ओळखले जाते, तो आणि भाजप यांच्यात देखील अनेक गोष्टी सारख्या आहेत. इतकेच नाही तर या दोन देशांमधील विरोधी पक्षांमध्ये देखील अनेक समानता दिसून येतात.

तुर्कीतील विरोधीपक्षाचे नेते कमाल आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांची देखील तुलना होते. यामागे काही ठळक कारणे आहेत.

विशेष म्हणजे, तुर्कीतील विरोधीपक्ष रिपब्लिकन पीपल्स पार्टी (CHP, तुर्की), ज्या पक्षाला समृद्ध ऐतिहासिक वारसा आहे. हा भारतातील काँग्रेस पक्षासारख्याच समस्यांना तोंड देत आहे. स्वातंत्र्यलढ्यात आणि प्रजासत्ताकाच्या स्थापनेत भूमिका बजावणारी काँग्रेस ज्याप्रमाणे महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू आणि इतर अनेक स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसा सांगते. त्याचप्रमाणे सीएचपी देखील आधुनिक तुर्कीचे संस्थापक मुस्तफा केमाल अतातुर्क यांचा वारसा सांगते. अतातुर्क यांनी 9 सप्टेंबर 1923 रोजी सीएचपीची स्थापना केली होती

turkey presidential election similarities in condition of opposition in india congress rahul gandhi and chp kemal
IAS Tina Dabi : पाकिस्तानातून आलेल्या १५० हिंदूंच्या घरांवर चालवला बुलडोझर; कलेक्टर टीना डाबी निशाण्यावर

तुर्की आणि भारताच्या राजकारणात अनेक समानता

दोन्ही देशांमधील राजकारणात असलेलं साम्य इथेच संपत नाही. सीएचपी, ज्याने तुर्कीवर जवळजवळ 33 वर्षे राज्य केले, 1979 पासून सत्तेवर नाही. 1979 मध्ये, मुस्तफा बुलेंट इसेविट यांच्या नेतृत्वाखालील मध्यावधी निवडणुकांमध्ये पक्षाचा पराभव झाला. तेव्हापासून हा पक्ष वेगवेगळ्या सरकारांना, अनेक राष्ट्रपतींना आणि पंतप्रधानांचा पाठिंबा देणारा पक्ष राहिला आहे.

परंतु 2002 मध्ये एर्दोगानच्या एके पक्षाच्या राजकीय पटलावर उदय झाल्यामुळे, ब्लॅक सी, मध्य अनातोलिया आणि पूर्व अनातोलियाच्या गरीब आणि कमी विशेषाधिकार असलेल्या प्रदेशांमध्ये पक्षाचा प्रभाव खूपच कमी झाला आहे. हे यूपी आणि बिहारच्या हिंदी भाषीक राज्यांमध्ये काँग्रेस पक्ष संकुचित होण्यासारखे आहे, असे मानले जाते.

turkey presidential election similarities in condition of opposition in india congress rahul gandhi and chp kemal
Kurulkar Case : कुरूलकर परदेशी दौऱ्यात प्रत्यक्ष 'ती'ला भेटला, ब्लॅकमेल नव्हे स्वेच्छेनेच दिली माहिती…?

CHP चा राजकीय प्रभाव आता श्रीमंत उच्चभ्रू भूमध्यसागरीय आणि एजियन प्रदेशांपुरता मर्यादित आहे, ज्यात इस्तंबूल, इझमिर आणि अंकारा सारख्या प्रमुख शहरांचा समावेश आहे. देशातील वंचित भागात प्रभाव वाढवणाऱ्या एर्दोगन यांना शह देण्याचा मार्ग पक्षाला सापडलेला नाहीये.

सीएचपी नेते कमल आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यात समानता म्हणजे या दोघांसमोर असलेली आव्हाने एकसारखीच आहेत. तुर्कीत नुकतेच संपलेल्या निवडणुकांमध्ये पहिल्या फेरीत एर्दोगान यांच्या विरोधात कडवी झुंज देणारे त्यांचे नेते केमाल कलचदारलू यांना आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना काँग्रेसला नवसंजीवनी देण्याच्या प्रयत्न करताना सारख्याच समस्यांचा सामना करावा लागला.

74 वर्षीय माजी नौकरशाह कमाल हे त्यांच्या सडपातळ बांधा आणि विनम्रता यामुळे तुर्कीचे गांधी असेही म्हटले जाते. त्यांच्याकडे पाहिल्यावर देखील ते तरुणपणीचे महात्मा गांधी यांच्यासारखे दिसतात.

turkey presidential election similarities in condition of opposition in india congress rahul gandhi and chp kemal
Trimbakeshwar Temple Controversy : 'इथून पुढे मंदिराच्या पायऱ्यांवर…'; 'ती' मिरवणूक काढणाऱ्यांचा उद्वेग

राहुल गांधींशी आणखी एक साम्य

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत भारताच्या कन्याकुमारीच्या दक्षिण टोकापासून जम्मू आणि काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशापर्यंत 4,080 किमीचा प्रवास केला. मात्र याच्या खूप आधी कमाल यांनी 2017 मध्ये अंकारा ते इस्तांनबुल प्रवास केला होता.कमाल यांची 432 किलोमीटरची यात्रा देखील लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्यासाठी होती. तसेच गार्डियनमध्ये प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार, कमल हे देखील राहुल गांधींप्रमाणेच मीडिया माहितीचा विपर्यास करून विरोधकांकडे दुर्लक्ष करत असल्याबद्दल बोलतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.