Turkey Terror Attack: तुर्कस्तानात मोठा दहशतवादी हल्ला! शक्तीशाली स्फोटात 3 सैनिक ठार, तर १४ जण जखमी

Turkey Terror Attack Marathi News : स्थानिक मीडियानं दाखवलेल्या दृश्यांनुसार स्फोटानंतर मोठ्या प्रमाणावर धुराचे ढग आणि आगीच्या ज्वाळा आकाशात मोठ्या उंचीपर्यंत दिसत होत्या.
Turkey
Turkey
Updated on

Turkey Terror Attack Marathi News : मोठ्या दहशतवादी हल्ल्यानं तुर्कस्तान हा देश हादरला आहे. राजधानी अंकाराजवळच्या तुर्कीश एअरोस्पेस इंडस्ट्रीज (TAI) या कंपनीच्या मुख्यालयाबाहेर दहशतवाद्यांनी हा स्फोट घडवून आणल्याचं सांगितलं जात आहे. या स्फोटात ३ सुरक्षा रक्षकांचा मृत्यू झाला असून १४ जण जखमी झाले आहेत, अशी माहिती तुर्कीच्या इंटेरिअर मंत्र्यांनी दिली. त्यांनी हा स्फोट म्हणजे दहशतवादी हल्ला असल्याचं म्हटलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.