स्टॉकहोम : गेल्या काही वर्षांत लहान मुलांचा स्क्रीन टाइम वाढत असल्याने जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. त्यांच्या डोळ्यावर आणि आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. स्वीडनच्या सरकारने १८ वर्षापर्यंतच्या मुलांसाठी स्क्रीन टाइमसंदर्भात नवीन शिफारशी आणल्या आहेत. यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून लहान बाळांना आणि अल्पवयीन मुलांचा स्क्रीन टाइम कमी ठेवण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. दोन वर्षापेक्षा कमी वयोगटातील मुलांना डिजिटल मीडिया आणि टेलिव्हिजन पाहण्यास पूर्णपणे बंदी घातली आहे.