Twitter Deal : जर Elon Musk ट्विटरचे 'बॉस' बनले तर 5 हजारहून अधिक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार!

करार मोडल्यास इलॉन मस्कवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
Elon Musk Twitter Deal
Elon Musk Twitter Dealesakal
Updated on
Summary

करार मोडल्यास इलॉन मस्कवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

Elon Musk Twitter Deal : इलॉन मस्क (Elon Musk) सोशल मीडिया कंपनीचा मालक झाल्यास ट्विटरच्या (Twitter) बहुतेक कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची योजना आखत आहे. मस्कनं संभाव्य गुंतवणूकदारांना ट्विटर विकत घेण्यास सांगितलंय.

द वॉशिंग्टन पोस्टच्या अहवालानुसार, ट्विटरच्या 7,500 कर्मचार्‍यांपैकी 75 टक्के कमी करण्याची त्यांची योजना आहे. वॉशिंग्टन पोस्टनं काही कागदपत्रं आणि अज्ञात सूत्रांच्या हवाल्यानं ही माहिती दिलीय. सॅन फ्रान्सिस्को-ट्विटर आणि मस्क अॅटर्नी अॅलेक्स स्पिरोच्या प्रतिनिधींनी या वृत्ताला कोणताही प्रतिसाद दिलेला नाहीय.

जगातील सर्वात श्रीमंत अब्जाधीश इलॉन मस्क ट्विटर इंकचे (Twitter Inc) बॉस बनले तर 5600 हून अधिक कर्मचाऱ्यांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागणार आहेत. सोशल मीडिया कंपनीच्या 7,500 कर्मचाऱ्यांपैकी 75 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची त्यांची योजना आहे. इलॉन मस्क यांना या महिन्यात कराराला अंतिम रूप द्यावं लागणार आहे, अन्यथा करार मोडल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.

Elon Musk Twitter Deal
लिझ यांच्या राजीनाम्यानंतर ब्रिटनचा पुढील पंतप्रधान कोण? ऋषी सुनक यांच्या समोर 'या' 4 दिग्गजांचं आव्हान!

अहवालानुसार, कंपनीचा मालक कोणीही असो, येत्या काही महिन्यांत नोकऱ्यांमध्ये कपात अपेक्षित आहे. ट्विटरच्या सध्याच्या व्यवस्थापनानं पुढील वर्षाच्या अखेरीस कंपनीच्या वेतनात सुमारे $800 दशलक्ष कपात करण्याची योजना आखलीय. मस्क यांनी यापूर्वी कंपनीच्या काही कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची गरज असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. परंतु, त्यांनी किती कर्मचाऱ्यांना काढणार हे सांगितलं नाही. दरम्यान, ट्विटरनं आपल्या कर्मचार्‍यांना याबाबत स्पष्टीकरण दिलंय की, कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकण्याची त्यांची कोणतीही योजना नाहीय. ट्विटरचे जनरल काउंसिल सीन एडगेट (Sean Edgett) यांनी कर्मचार्‍यांना ई-मेलद्वारे ही माहिती दिली.

Elon Musk Twitter Deal
चंबातील महिलांना दिलेलं वचन मोदींनी केलं पूर्ण; 'चोला डोरा' ड्रेस घालून PM पोहोचले केदारनाथाच्या दर्शनाला..

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कंपनीनं बॉट्स आणि स्पॅम खात्यांची संख्या कमी केल्याचा आरोप करून मस्कनं मे महिन्यात ट्विटर विकत घेण्याच्या करारापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं दोन्ही पक्षांमधील खटल्यांची मालिका सुरू झाली. या महिन्याच्या सुरुवातीला मस्कनं आपली भूमिका बदलून मूळ अटींवर कराराचा पाठपुरावा करेल, असं सांगितलं.

Elon Musk Twitter Deal
Amit Shah : जवानांवर दगडफेक करणारे आता पंच आणि सरपंच झालेत?

एप्रिलमध्ये ट्विटर विकत घेण्यासाठी 44 अब्ज डॉलरच्या बोलीनंतर मस्कनं या करारातून माघार घेतली होती. ट्विटरनं त्याच्या प्लॅटफॉर्मवर बनावट खात्यांची संख्या चुकीची मांडली आहे, असा युक्तिवाद करून मस्क करारातून मागे हटले. यानंतर ट्विटरनं खटला दाखल केला आणि कोर्टानं दोन्ही पक्षांना 28 ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली, जर हे प्रकरण निकाली निघालं नाही तर नोव्हेंबरमध्ये खटला चालवला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.