Twitter: डोनाल्ड ट्रम्प यांची ट्विटरवर एन्ट्री होताच सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

Twitter
Twitteresakal
Updated on

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रक्षोभक ट्विटमुळे जानेवारी 2021 मध्ये ट्विटरवरील त्यांच्या अकाऊंटवर बंदी घालण्यात आली होती. मात्र आता तब्बल २२ महिन्यांनी ट्रम्प यांची ट्विटरवर पुन्हा एन्ट्री झाली आहे. त्यांच्या या एन्ट्रीनंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पाहायला मिळत आहे. (Twitter Donald Trump come back sharing funny memes social media )

2021 मध्ये कॅपिटल हिल हिंसाचारानंतर, डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंसाचार करणाऱ्या त्यांच्या समर्थकांना ट्विटरवर क्रांतिकारक म्हटले होते. यानंतर त्यांनी 20 जानेवारी 2021 रोजी होणाऱ्या राष्ट्रपतींच्या उद्घाटन समारंभाला (बायडेन यांच्या शपथविधीला) जाणार नसल्याचे सांगितले होते. यावर कारवाई करत ट्विटरने त्यांचे अकाऊंट कायमचे सस्पेंड केले होते.

उद्योगपती इलॉन मस्क यांच्याकडे ट्विटरची मालकी आल्यानंतर अनेक वेगवान घडामोडी घडत असतानाच, ट्रंप यांचं अकाऊंट पुन्हा सुरू करण्याचा निर्णय झालाय. डोनाल्ड ट्रंप यांचं अकाऊंट पुन्हा सुरू करावं का, यासाठी इलॉन मस्क यांनी ट्विटरवर पोल घेतला होता. त्यात ट्रंप यांचं अकाऊंट सुरू करण्याच्या बाजूनं अधिक मतं पडली.

मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी अद्याप एकही ट्विट केलेले नाही. यावरुन युजर्स मीम्स शेअर करताना दिसत आहे. विशेष म्हणजे त्यांनी एनल मस्कचादेखील समावेश केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.