Twitter कडून भारताला 110 कोटींची मदत

Twitter कडून भारताला 110 कोटींची मदत
Updated on

नवीन स्ट्रेनमुळे देशातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. त्यातच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भारतामधील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडालाय. ऑक्सजन आणि बेडच्या तुटवड्यामुळे अनेकांना आपले प्राणही गमवावे लागलेत. कोरोना संकटात जगभरातानू भारताला मदतीचा ओघ सुरु आहे. गुगल आणि मायक्रोसॉफ्टनंतर मायक्रोब्लॉगिंग साइट Twitter ही भारताच्या मदतीला धावलं आहे. ट्विटरनं भारताला तब्बल 15 मिलियन डॉलर इतकी मदत जाहीर केली. भारतीय चलनात हा आकडा जवळपास 110 कोटी रुपयांच्या घरात जातो.

ट्विटरचे सीईओ जॅक डोरसी (Twitter CEO Jack Patrick Dorsey) यांनी सोमवारी ट्विट करत याबाबतची माहिती दिली. 15 मिलियन डॉलर रक्कम तीन सामाजिक संस्थांना (NGO) दान करण्यात आली आहे. यामध्ये केयर (Care), एड इंडिया (Aid India) आणि सेवा इंटरनेशनल यूएसए (Sewa International USA) यांचा समावेश आहे. CARE ला USD 10 मिलियन डॉलर, Aid India आणि Sewa International USA यांना प्रत्येकी 2.5 मिलियन डॉलर देण्यात येणार आहेत.

Twitter कडून भारताला 110 कोटींची मदत
कोव्हिड सेंटरसाठी बिग बींची कोट्यवधींची मदत

सेवा इंटरनेशनल एक हिंदू आस्था आधारित, मानवीय, नॉन प्रॉफिट सर्विस ऑर्गनाइजेशन आहेत. ही एनजीओ ऑक्सीजन कॉन्संट्रेटर, व्हेंटिलेटर, BiPAP (Bilevel Positive Airway Pressure) आणि CPAP (Continuous Positive Airway Pressure) यासाऱ्या यंत्रसामुग्री खरेदी करण्यास मदत करते. या एनजीओमार्फत सर्व सुविधा सरकारी रुग्णालयांना पुरवल्या जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.