Twitter New Logo : भुर्रर्र...ट्विटरची चिमणी उडाली! लोगो मध्ये आणला नवा प्राणी

सोमवारी रात्रीपासून यूजर्सना त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर निळ्या पक्ष्याऐवजी कुत्रा दिसू लागला
Twitter New Logo
Twitter New LogoEsakal
Updated on

इलॉन मस्क यांनी ट्विटरची सूत्र हातात घेतल्यापासून ट्विटर कंपनी सातत्याने चर्चेत आहे. कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हातात नारळ देणं असो, अनेक कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन कपात करून त्यांना परत बोलावणं असो किंवा ब्लू टिक बाबतचे अनेक निर्णय यामुळे ट्विटर आणि इलॉन मस्क सतत चर्चेत राहिले आहेत. आता पुन्हा एकदा ट्विटर चर्चेत आलं आहे. कारण इलॉन मस्क यांनी आता ट्विटरच्या लोगोमध्ये मोठा बदल केला आहे.

ट्विटरची ओळख असलेला निळा पक्षी (Blue Bird) आता गायब झाला आहे. नव्या बदलानंतर अनेक जण चकित झाले आहेत. ट्विटरने 'डॉज' हा आपला नवा लोगो बनवला आहे. ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांनीही यासंदर्भात एक ट्विट केले आहे.

सोमवारी रात्रीपासून यूजर्सना त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर निळ्या पक्ष्याऐवजी कुत्रा दिसू लागला होता. मात्र हा एरर आहे की काय असा प्रश्न अनेकांना पडला होता. त्यानंतर काही वेळातच #DOGE ट्विटरवर ट्रेंड करू लागले. ट्विटर हॅक झालं की काय असंही अनेकांना वाटलं. मात्र यानंतर काही वेळातच इलॉन मस्कने एक ट्विट करुन ट्विटरने आपला लोगो बदलल्याचे स्पष्ट केलं आहे.

Twitter New Logo
Rahul Gandhi Gets Bail: सुरत कोर्टातून जामीन मिळाल्यानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

ट्विटरच्या लोगो बदल्यानंतर इलॉन मस्क यांनी मजेशीर ट्वीट केलं आहे. यामध्ये एक पोलीस अधिकारी एका कुत्र्याचा ड्रायव्हिंग लायसन्स तपासत आहे. या पोलिसाने ब्लू बर्डचा फोटो हातात धरला आहे. तर गाडीत बसलेला कुत्रा सांगत आहे की 'हा जुना फोटो आहे.'

डोज लोगो काय आहे?

इलॉन मस्क यांनी ट्विटरचा लोगो का बदलला आहे याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉज इमेज शिबू इनू आणि डॉजकॉइन ब्लॉकचेन आणि क्रिप्टोकरन्सीचे प्रतीक आणि लोगो आहे. 2013 मध्ये इतर क्रिप्टोकरन्सीसमोर एक गमंत म्हणून ही करन्सी लॉन्च केली होती.

त्याचबरोबर इलॉन मस्कच्या घरीही कुत्रे आहेत. त्या कुत्र्यांचे फोटोही ते वारंवार ट्विटरवर शेअर करत असतात.

Twitter New Logo
Patra Chawl Case : संजय राऊतांना तुरुंगवास भोगावा लागलेलं पत्राचाळ प्रकरण पुन्हा चर्चेत; ईडीकडून मोठी कारवाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.