Elon Musk : 'आमच्याकडे दुसरा पर्याय नाही, सरकारचं ऐकावंच लागतं'; जॅक डॉर्सीच्या आरोपांवर इलॉन मस्कची प्रतिक्रिया

पंतप्रधानांच्या भेटीनंतर मस्क यांनी आपण मोदींचे फॅन असल्याचं म्हटलं आहे.
Elon Musk Jack Dorsey
Elon Musk Jack DorseyeSakal
Updated on

ट्विटरचे माजी सीईओ जॅक डॉर्सी (Jack Dorsey) यांनी काही दिवसांपूर्वी मोदी सरकारवर गंभीर आरोप केले होते. शेतकरी आंदोलनांवेळी कित्येक ट्विटर अकाउंट बंद करण्यासाठी सरकारने दबाव आणल्याचा हा आरोप होता. यावर आता ट्विटरचे नवीन मालक इलॉन मस्क (Elon Musk) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर मस्कने ही प्रतिक्रिया दिली.

जॅक डॉर्सी यांनी केलेल्या आरोपांबद्दल विचारलं असता, आमच्याकडे स्थानिक सरकारचं ऐकण्याशिवाय दुसरा पर्याय नाही असं मस्क म्हणाले. यावेळी त्यांनी फ्री-स्पीचबाबत देखील स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, की ट्विटर नेहमीच लोकांना बोलण्याचं स्वातंत्र्य देईल, मात्र सरकारच्या कायद्यांनुसारच.

Elon Musk Jack Dorsey
PM Modi Met Elon Musk: इलॉन मस्कही PM मोदींचे फॅन! पंतप्रधानाच्या भेटीनंतर म्हणाले, 'भारताच्या भविष्याबद्दल...'

काय म्हणाले मस्क?

इलॉन मस्क यांनी अमेरिका दौऱ्यावर असणाऱ्या पंतप्रधान मोदींची भेट घेतली. या भेटीनंतर मस्क यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जेव्हा एका पत्रकाराने जॅक डॉर्सींनी केलेल्या आरोपांबद्दल विचारलं, तेव्हा मस्क म्हणाले - "आमच्याकडे स्थानिक सरकारने केलेली मागणी मान्य करण्याव्यतिरिक्त दुसरा पर्याय नाही. जर आम्ही स्थानिक कायद्यांचं पालन केलं नाही, तर (त्या देशात) ट्विटर बंद केलं जाईल. त्यामुळे सरकारच्या कायद्यांचं पालन करणं एवढंच आम्ही करू शकतो. या कायद्यांच्या चौकटीत राहूनच आम्ही फ्री-स्पीच देण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यापेक्षा अधिक आम्ही करू शकत नाही."

जॅक डॉर्सींचे आरोप

देशात शेतकरी आंदोलन सुरू असताना मोदी सरकारने कित्येक ट्विटर अकाउंट्स बॅन करण्याची मागणी केली होती. हे अकाउंट बॅन न केल्यास, भारतात ट्विटर बंद करू अशी धमकी सरकारने दिल्याचा आरोप जॅक डॉर्सी यांनी केला होता.

Elon Musk Jack Dorsey
PM Modi US Visit : पंतप्रधानांचा चार दिवसीय अमेरिका दौरा सुरू; द्विपक्षीय संबंधांच्या बळकटीची संधी

दरम्यान, डॉर्सी यांच्या आरोपांनंतर केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं होतं. या आंदोलनांवेळी सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात चुकीची माहिती पसरवली जात होती. केवळ चुकीच्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने ही मागणी केली होती, असं चंद्रशेखर यांनी म्हटलं होतं.

मस्क मोदींचे फॅन

दरम्यान पंतप्रधानांच्या भेटीनंतर मस्क यांनी आपण मोदींचे फॅन असल्याचं म्हटलं आहे. "मोदी हीरो आहेत, त्यांना भारत देशासाठी खूप काही करायचं आहे, त्यांच्याशी अतिशय व्यापक चर्चा झाली", असंही इलॉन मस्क यावेळी म्हणाले. यासोबतच, पुढील वर्षी आपण भारत दौऱ्यावर येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Elon Musk Jack Dorsey
Elon Musk: इलॉन मस्कला मोठा धक्का! ट्विटरवर 2,000 कोटींच्या नुकसान भरपाईचा दावा; काय आहे प्रकरण?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.