डोनाल्ड ट्रम्प, कंगना रणौत सारखी लाखो बंद ट्विटर खाती पुन्हा सुरु होणार? Elon Musk नं दिलं स्पष्ट उत्तर

मायक्रो-ब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरचा मालक आता इलॉन मस्क झाला आहे.
Elon Musk Twitter Deal
Elon Musk Twitter Dealesakal
Updated on
Summary

मायक्रो-ब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरचा मालक आता इलॉन मस्क झाला आहे.

Elon Musk Twitter Deal : मायक्रो-ब्लॉगिंग वेबसाइट 'ट्विटर'चा मालक आता इलॉन मस्क (Elon Musk) झाला आहे. करार निश्चित होताच, इलॉन मस्कनं ट्विट करून 'पक्षी आता मुक्त झाला' असा संदेश दिला. इलॉन मस्कच्या हातात ट्विटरची कमान आल्यानंतर ज्यांचं ट्विटर अकाउंट कायमचं बंद झालंय, त्यांच्यासाठी एक आशा निर्माण झालीय.

यामध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचा समावेश आहे. अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या निकालानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जाणूनबुजून खोटे आणि चिथावणीखोर ट्विट केल्याचा आरोप करण्यात आला होता. या कारणामुळं त्यांचं खातं कायमचं बंद करण्यात आलं. आता अशा ट्विटर अकाऊंटवर (Twitter Account) काय कारवाई करणार, याचं उत्तर खुद्द इलॉन मस्कनं दिलंय.

Elon Musk Twitter Deal
Twitter Deal : 10 महिन्यांपूर्वी ट्विटरमध्ये होती 5 टक्के हिस्सेदारी; आता मस्क बनले मालक

इलॉन मस्कनं ट्विटमध्ये सांगितलं की, ट्विटरमध्ये कंटेंट मॉडरेशन कौन्सिलची (Content Moderation Council) स्थापना केली जाईल. ही परिषद लोकांचे ट्विट आणि त्यातील मजकूर याबाबत निर्णय घेईल. हीच परिषद बंद पडलेल्या खात्यांचा आढावा घेणार असल्याचं मस्क यानं म्हटलंय. या आढाव्यानंतरच बंद झालेली खाती पुन्हा सुरू होणार की नाही याबाबत निर्णय घेतला जाईल. आता ट्विटरमध्ये अनेक बदल पाहायला मिळतील, असंही मस्कनं स्पष्टपणे सांगितलं.

Elon Musk Twitter Deal
Twitter चे मालक होताच Elon Musk ची मोठी कारवाई; CEO पराग अग्रवाल यांची हकालपट्टी

इलॉन मस्कनं ट्विटर विकत घेतल्यानंतर काही तासांतच CEO पराग अग्रवाल यांना हटवण्यात आलं. त्यांच्यासोबत मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) नेड सेहगल आणि कायदेशीर व्यवहार आणि धोरण प्रमुख विजया गड्डे या आणखी दोन अधिकाऱ्यांनाही बडतर्फ करण्यात आलं आहे. मस्कनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बनावट खात्यांच्या संख्येबद्दल त्यांची आणि ट्विटरच्या गुंतवणूकदारांची दिशाभूल केल्याचा आरोप केला आहे.

Elon Musk Twitter Deal
Twitter Deal : ..तर Elon Musk ला पराग अग्रवालांना द्यावे लागणार 346 कोटी; जाणून घ्या का?

..म्हणून ट्विटरसोबत करार केला : इलॉन मस्क

त्याचबरोबर मस्कनं ट्विटरसोबतच्या कराराची अनेक कारणं दिली आहेत. भविष्यात ट्विटरच्या जाहिरात धोरणातही बदल करण्यात येणार असल्याचं मस्कनं सूचित केलं. ट्विटर हे सर्वोत्कृष्ट जाहिरात प्लॅटफॉर्म व्हावं अशी माझी इच्छा आहे. जिथं सर्व वयोगटातील युजर्स चित्रपट पाहू शकतील किंवा व्हिडिओ गेम खेळू शकतील. मी ट्विटरवर अधिक पैसे कमवण्यासाठी नव्हे तर मानवतेला मदत करण्यासाठी करार केला आहे. विशेष म्हणजे, न्यायालयानं मस्क यांना सध्याच्या अटींवर 28 ऑक्टोबरपर्यंत ट्विटर करार अंतिम करण्यास सांगितलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()