Pakistan : खैबर पख्तुन्ख्वा प्रांतात ३५ जण ठार;पाकमध्ये जमिनीच्या वादावरून दोन टोळ्यांत धुमश्‍चक्री

जमिनीच्या वादावरून दोन टोळ्यांत पाच दिवसांपासून धुमश्‍चक्री सुरू असून ३६ जणांचा मृत्यू तर १६२ जण जखमी झाल्याची घटना खैबर पख्तुन्ख्वा प्रांतातील कुर्रम जिल्ह्यात घडली.
Pakistan
Pakistan sakal
Updated on

पेशावर : जमिनीच्या वादावरून दोन टोळ्यांत पाच दिवसांपासून धुमश्‍चक्री सुरू असून ३६ जणांचा मृत्यू तर १६२ जण जखमी झाल्याची घटना खैबर पख्तुन्ख्वा प्रांतातील कुर्रम जिल्ह्यात घडली. अफगाणिस्तान सीमेलगत असलेल्या खैबर पख्तुन्ख्वा प्रांतात दोन टोळ्यांत संघर्ष सुरू आहे. या भागाला आदिवासी आणि धार्मिक गटांत हिंसाचाराचा इतिहास असून जातीय दंगलीबरोबरच दहशतवादी हल्ले देखील झाले आहेत. तालिबानने देखील या भागाला नेहमीच लक्ष्य केले आहे.

चार दिवसांपूर्वी जमिनीवरून वादावरून दोन समुदायात हिंसाचार सुरू झाला. या हिंसाचाराचे लोण या प्रांतातील पीवर, टांगी, बालिशेल, खार कले, मकबल, कुंज अलीजई, पारा चमकानी आणि करमनसह अन्य ठिकाणी पसरले. दोन्ही टोळ्यांतील लोकांनी एकमेकांवर रॉकेट लाँचरसह बॉम्बफेक केली. तसेच अत्याधुनिक शस्त्रांचाही वापर केला गेला. टोळींचे प्राबल्य असलेल्या कुर्रम जिल्ह्यातील मुख्य शहर पाराचिनार आणि सादा येथे रॉकेटचा मारा करण्यात आला. काल रात्री गोळीबाराच्या घटना घडल्या. त्यात काही जण जखमी झाले आणि सर्व शैक्षणिक संस्था, बाजार बंद ठेवण्यात आले. मुख्य रस्त्यावरची वाहतूकही बंद आहे.

हिंसाचारग्रस्त भागात पोलिस आणि सुरक्षा दलाची कुमक तैनात करण्यात आली आहे. दोन समुदायातील संघर्ष कमी करण्यासाठी टोळीतील ज्येष्ठ नगरिक, सैनिक अधिकारी, पोलिस आणि जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने अधिकाऱ्यांनी बोशेरा, मालिखेल, डांडर भागात मध्यस्थी केली. मात्र अजूनही हिंसाचार सुरू आहे. एका अधिकाऱ्याने संवेदनशील भागात संघर्ष रोखण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.पेशावर, ता. २९ (पीटीआय): जमिनीच्या वादावरून दोन टोळ्यांत पाच दिवसांपासून धुमश्‍चक्री सुरू असून ३६ जणांचा मृत्यू तर १६२ जण जखमी झाल्याची घटना खैबर पख्तुन्ख्वा प्रांतातील कुर्रम जिल्ह्यात घडली. अफगाणिस्तान सीमेलगत असलेल्या खैबर पख्तुन्ख्वा प्रांतात दोन टोळ्यांत संघर्ष सुरू आहे. या भागाला आदिवासी आणि धार्मिक गटांत हिंसाचाराचा इतिहास असून जातीय दंगलीबरोबरच दहशतवादी हल्ले देखील झाले आहेत. तालिबानने देखील या भागाला नेहमीच लक्ष्य केले आहे.

चार दिवसांपूर्वी जमिनीवरून वादावरून दोन समुदायात हिंसाचार सुरू झाला. या हिंसाचाराचे लोण या प्रांतातील पीवर, टांगी, बालिशेल, खार कले, मकबल, कुंज अलीजई, पारा चमकानी आणि करमनसह अन्य ठिकाणी पसरले. दोन्ही टोळ्यांतील लोकांनी एकमेकांवर रॉकेट लाँचरसह बॉम्बफेक केली. तसेच अत्याधुनिक शस्त्रांचाही वापर केला गेला. टोळींचे प्राबल्य असलेल्या कुर्रम जिल्ह्यातील मुख्य शहर पाराचिनार आणि सादा येथे रॉकेटचा मारा करण्यात आला. काल रात्री गोळीबाराच्या घटना घडल्या.

त्यात काही जण जखमी झाले आणि सर्व शैक्षणिक संस्था, बाजार बंद ठेवण्यात आले. मुख्य रस्त्यावरची वाहतूकही बंद आहे. हिंसाचारग्रस्त भागात पोलिस आणि सुरक्षा दलाची कुमक तैनात करण्यात आली आहे. दोन समुदायातील संघर्ष कमी करण्यासाठी टोळीतील ज्येष्ठ नगरिक, सैनिक अधिकारी, पोलिस आणि जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने अधिकाऱ्यांनी बोशेरा, मालिखेल, डांडर भागात मध्यस्थी केली. मात्र अजूनही हिंसाचार सुरू आहे. एका अधिकाऱ्याने संवेदनशील भागात संघर्ष रोखण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()