Pakistan: पाकिस्तानमध्ये माजी सरन्यायाधीशांच्या घरावर हल्ला; नवाज शरीफांना ठरवलं होतं अपात्र!

पाकिस्तानचे माजी सरन्यायाधीश साकिब निसार यांच्या लाहौरमधील घरावर हल्ला झाल्याची माहिती मिळत आहे. पाकिस्तानच्या डॉन या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
Two police injured in grenade attack on ex CJ of pakistan Saqib Nisar house in Lahore
Two police injured in grenade attack on ex CJ of pakistan Saqib Nisar house in Lahore
Updated on

इस्लामाबाद- पाकिस्तानचे माजी सरन्यायाधीश साकिब निसार यांच्या लाहौरमधील घरावर हल्ला झाल्याची माहिती मिळत आहे. पाकिस्तानच्या डॉन या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. चक्क माजी सरन्यायाधीशांच्या घरावर ग्रेनेड हल्ला झाला असल्याने खळबळ उडाली आहे. माहितीनुसार, या हल्ल्यामध्ये दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. यात सरन्यायाधीश आणि त्यांचे कुटुंबीय थोडक्यात बचावल्याचं सांगितलं जातंय.

सरन्यायाधीशांच्या घरावरच हल्ला झाला असल्याने पाकिस्तानमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. माहितीनुसार, हल्ल्यामध्ये साकिब निसार यांची कार पूर्णपणे उद्धवस्त झालीय. दाव्यानुसार हा दहशतवादी हल्ला आहे. विशेष म्हणजे साकिब निसार यांनी सरन्यायाधीश असताना २०१७ मध्ये माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना अपात्र ठरवलं होतं. (Two police injured in grenade attack on ex CJ of pakistan Saqib Nisar house in Lahore )

Two police injured in grenade attack on ex CJ of pakistan Saqib Nisar house in Lahore
Nawaz Sharif: पाकिस्तान भीकेला कशामुळे लागला? भारत नाही, तर... नवाज शरीफ सत्यच बोलले

सदर घटनेनंतर पोलीस यंत्रणा घटनास्थळी पोहोचली होती. याप्रकरणी अधिक तपास केला जात आहे. पंजाब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी सरन्यायाधीशांचे कुटुंब पूर्णपणे सुरक्षित आहे. याप्रकरणी दहशतवाद किंवा इतर दृष्टीकोनातून प्रकरणाचा तपास केला जात आहे. माजी सरन्यायाधीशांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. जखमी पोलीस कर्मचाऱ्यांवर आवश्यक ते उपचार केले जातील.

हल्ल्याची माहिती मिळतात बचाव पथक घटनास्थळी पोहोचले होते. त्यानंतर जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पंजाब पोलिसांनी सांगितलं की, प्राथमिक तपासानुसार हा विदेशी शक्तींचा भ्याड हल्ला आहे. देशात भय आणि दहशत माजवण्याचा त्यांचा प्रयत्न असू शकतो. त्यामुळे याप्रकरणी अधिक पुराव्यांचा शोध घेतला जाईल. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल.

Two police injured in grenade attack on ex CJ of pakistan Saqib Nisar house in Lahore
दाऊदवरील विषप्रयोगामुळे पाकिस्तान अडचणीत

माजी पंतप्रधानांना ठरवलं होतं अपात्र

साकिब निसार यांची १८ फेब्रुवारी २०१० मध्ये सुप्रीम कोर्टात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली होती. त्याआधी ते लाहौर हाय कोर्टात न्यायाधीश होते. २०१७ मध्ये त्यांनी तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांना पदावरुन हटवणे योग्य ठरवलं होतं. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.