दक्षिण कोरियाच्या दोन विमानांची टक्कर; तीन पायलट ठार

दक्षिण कोरियाच्या वायुदलाने एका निवेदनात या अपघाताची पुष्टी केली
South Korean air force plane
South Korean air force planeसकाळ डिजिटल टीम
Updated on

प्रशिक्षणादरम्यान दोन दक्षिण कोरियाच्या विमानांची टक्कर झाली असून या दुर्घटनेत तीन पायलट ठार तर अन्य काही जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. (Two trainer aircraft of South Korea's air force collided )

South Korean air force plane
Photo Story: श्रीलंकेतील डिझेल संपले; आंदोलकांनी राष्ट्रपतींच्या घराबाहेर पेटवली बस

दक्षिण-पूर्व शहरातील सचेओनमधील KT-1 विमानतळाजवळ दुपारी सुमारे दिड वाजता हा अपघात झाला. त्यानंतर घटनास्थळी अग्निशमन दलाने धाव घेतली.त्यांनंतर या अपघातात तीन पायलट ठार झाल्याची माहिती समोर आली तर अन्य किरकोळ जखमी आहेत.या अपघातात मृत्युच्या आकड्यांची पडताळणी सुरु आहे. त्यासाठी तीसहून अधिक अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि बचावकर्त्यांनी अपघाताच्या ठिकाणी शोध सुरू केला आहे.

South Korean air force plane
रशियाची मोठी खेळी: 'रुबल' ला दिलं बळ

इंडिपेंडंटमधील वृत्तानुसार ( the Independent), देशाच्या वायुदलाने एका निवेदनात या अपघाताची पुष्टी केली मात्र, अद्याप जीवितहानी झाल्याचे दुजोरा दिलेला नाही. एवढचं काय तर हवाई दलाच्या निवेदनात पायलट यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला की नाही याची माहिती सुद्धा दिलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.