Tropical Storm Nalgae : चिखलाच्या ढिगाऱ्याखाली १८ जणांचा मृत्यू

फिलिपिन्समध्ये पावसाचा तडाखा; जीवित हानी वाढण्याची शक्यता
Typhoon Nalgae hit Philippine landslide village Kusiong heavy rains 18 people died Tropical Storm Nalgae
Typhoon Nalgae hit Philippine landslide village Kusiong heavy rains 18 people died Tropical Storm Nalgaesakal
Updated on

मनिला : फिलिपिन्सला धडकलेल्या ‘नाल्गी’ वादळामुळे मुसळधार पाऊस पडून दक्षिणेकडील कुसिओंग गावाजवळील डोंगर खचला. यामुळे गावावर चिखलाचा ढिगाराच घसरून त्याखाली अनेक जण गाडले गेले आहेत. बचाव पथकाला आतापर्यंत १८ जणांचे मृतदेह सापडले असून आणखी ८० ते १०० जणांचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. काही वर्षापूर्वी आलेल्या सुनामीचा कुसिओंग गावाला मोठा फटका बसला होता. आज वादळामुळे मुसळधार पाऊस सुरू झाल्यानंतर समुद्रात पुन्हा एकदा मोठी लाट उसळल्याचे वृत्त गावात पसरल्याने नागरिकांनी भीतीने डोंगराच्या दिशेने धावण्यास सुरुवात केली होती. मात्र, त्याचवेळी डोंगर खचल्याने चिखलाच्या ढिगाऱ्याखाली अनेक नागरिक गाडले गेले. ‘नाल्गी’ वादळामुळे मागील चार दिवसांपासून पाऊस कोसळत असून त्यामुळे आठ प्रांतांमध्ये आतापर्यंत किमान ६१ जणांचा मृत्यू झाला आहे.

निसर्गाच्या रौद्रापुढे प्रशिक्षण फिके

सर्वाधिक नैसर्गिक आपत्ती येणाऱ्या देशांमध्ये फिलिपीन्सचा समावेश आहे. येथील कुसिओंग गावामध्ये तेंदुरे या अल्पसंख्याक समुदायाचे किमान दोन हजार लोक राहतात. सुनामीच्या अनुभवानंतर या गावामध्ये दरवर्षी नैसर्गिक आपत्तीपासून वाचण्यासाठी नागरिकांकडून सराव करून घेतला जातो. यामध्ये समुद्रपातळी वाढताच डोंगराच्या दिशेने जाण्याच्या सूचना सर्वांना देण्यात आल्या आहेत. आज मात्र, धोक्याचा इशारा देणारी घंटा वाजविण्यात आल्यानंतर नागरिक समुद्रापासून वाचण्यासाठी डोंगराच्या दिशेने पळत असताना डोंगरच खचल्याने अनेक नागरिक मृत्युच्या दाढेत लोटले गेले. फिलिपीन्सला १९७६ मध्ये एका मध्यरात्री बसलेल्या ८.१ रिश्‍टर तीव्रतेच्या भूकंपामुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()