विजय माल्याला लंडन कोर्टाचा दणका; आलिशान घर सोडावं लागणार

विजय माल्याला लंडन कोर्टाचा दणका; आलिशान घर सोडावं लागणार
Updated on
Summary

लंडनमधील आलिशान घरामध्ये विजय माल्याची ९५ वर्षीय आई राहते.

लंडन - कर्जबुडव्या उद्योगपती विजय माल्याला (Vijay Mallya) आता लंडनच्या (London) न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. लंडनमधील अलिशना घरातून बाहेर काढण्याच्या आदेशाला स्थगिती द्यावी अशी याचिका त्याने ब्रिटिश न्यायालयात केली होती. यावर झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने त्याची याचिका फेटाळून लावली आहे. स्वीस बँक युबीएससोबत (UBS Bank) माल्याचा वाद सुरु आहे. याच प्रकरणात त्याला घर रिकामे करण्याचे आदेश देण्यात आले होते. माल्यानं या आदेशाविरोधात न्यायालयात धाव घेतली होती.

लंडनच्या रिजेंट पार्कमध्ये १८/१९ कॉर्नवॉल टेरेस लक्जरी अपार्टमेंटमध्ये सध्या विजय माल्याची ९५ वर्षीय आई राहते. न्यायालयाने ही संपत्ती लाखो पाउंडची आणि मौल्यवान असल्याचं म्हटलं होतं. लंडनच्या हायकोर्टातील न्यायाधीश मॅथ्यू मार्श यांनी या प्रकरणी निर्णय दिला.

विजय माल्याला लंडन कोर्टाचा दणका; आलिशान घर सोडावं लागणार
कोरोनाविरोधात सरसकट निर्बंध नकोच : रोडरिको ऑफ्रिन

सुनावणीवेळी न्यायाधीशांनी म्हटलं की, माल्या कुटुंबाला थकीत रक्कम परत करण्यासाठी आता आणखी वेळ देण्याचा काही संबंध नाही. म्हणजेच माल्या कुटुंबाला आता त्यांचे आलिशान घर सोडावं लागणार आहे. माल्याला स्वीस बँकेचं २.०४ कोटी पाउंडचं कर्ज फेडायचं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.