UK General Election: ब्रिटनमध्ये निवडणूक प्रक्रिया कशी असते? हिंदूंचे मत किती निर्णायक? जाणून घ्या सर्व काही

UK General Election Rishi Sunak Vs Keir Starmer: देशातील सध्याचा कल पाहून ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी वेळेआधीच निवडणुकांची घोषणा केली. त्यामुळे ब्रिटनच्या राजकारणाच चांगलीच हालचाल पाहायला मिळत आहे.
rishi sunak
rishi sunakeSakal
Updated on

लंडन- जगातील सर्वात जुन्या संसदीय लोकशाहीमध्ये ब्रिटनचा उल्लेख केला जातो. मॅग्ना कार्टातून ब्रिटनच्या संसदीय लोकशाहीची पायाभरणी झाली आहे असं म्हणता येईल. ब्रिटनमध्ये मुदतीआधीच निवडणुकीची घोषणा झाली. देशातील सध्याचा कल पाहून ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी वेळेआधीच निवडणुकांची घोषणा केली. त्यामुळे ब्रिटनच्या राजकारणाच चांगलीच हालचाल पाहायला मिळत आहे.

४ जुलैला ब्रिटनमध्ये संसदीय निवडणुका होत आहेत. याच दिवशी उशिरा निवडणुकीचा निकाल लागेल. कंझर्वेटिव्ह पार्टीचे नेते पंतप्रधान ऋषी सुनक यांची लढत लेबर पार्टीचे नेते कीर स्टार्मर (Keir Starmer ) यांच्यासोबत आहेत. एक्झिट पोलमध्ये ऋषी सुनक (rishi sunak) हे पुन्हा सत्तेत येणे कठीण असल्याचं सांगण्यात आलं आहे. पण, सुनक यांनी विजयाचा निर्धार केला आहे. प्रचारामध्ये त्यांनी कोणतीही कमी ठेवली नाही. भारतीय वेळेनुसार ५ जुलैच्या सकाळी निवडणुकीचा निकाल स्पष्ट होईल.

rishi sunak
Rishi Sunak : ऋषी सुनक यांच्यासाठी भारतीयांचे मतदान निर्णायक;‘युगोव्ह’चे सर्वेक्षण, ‘कॉन्झर्व्हेटिव्ह’ला कमी समर्थन

ब्रिटनमधील निवडणुकांकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. ऋषी सुनक यांच्या हातून सत्ता गेल्यास ब्रिटनमध्ये धोरणात्मक बदल पाहायला मिळू शकतात. ब्रिटनमध्ये भारतीय वंशाचे लोक मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांचा कल देखील निवडणुकीत निर्णायक ठरत असतो. स्वत: ऋषी सुनक आणि त्यांच्या पत्नी या भारतीय वंशाच्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर ब्रिटनमध्ये संसदीय निवडणुका कशाप्रकारे होतात? कोणते प्रमुख पक्ष आहेत आणि निवडणुकीत कोणता प्रचाराचा मुद्दा होता? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

कशी असते मतदान प्रक्रिया?

यूकेमध्ये निवडणुका या गुरूवारी होतात. एकाच टप्प्यात म्हणजे एकाच दिवशी निवडणुकीची प्रक्रिया पार पडते. सकाळी सात वाजता मतदान सुरू होते आणि रात्री दहावाजेपर्यंत संपते. त्यानंतर लगेच अर्ध्यातासाने मतमोजणीला सुरुवात होते. यूकेमध्ये ६५० जागांसाठी मतदान होत असते. १८ वर्षे झालेल्या प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा हक्क आहे. एखादा नागरिक तुरुंगात असेल तर त्याला मतदान करता येत नाही.

rishi sunak
UK Election: ऋषी सुनक यांनी निवडणुकीची घोषणा करून घेतली 'रिस्क'; सत्तेत येणं किती आव्हानात्मक? जाणून घ्या

सर्वसाधारणपणे ब्रिटनमध्ये उमेदवार राजकीय पक्षाच्या बॅनरखालीच निवडणूक लढतात, पण अनेकजण अपक्ष देखील निवडणूक लढतात. सध्या ब्रिटनमध्ये कंझर्व्हेटिव्ह पार्टी आणि लेबर पार्टी या दोन पक्षांचे प्राबल्य आहे. गेल्या एक दशकभरापासून कंझर्व्हेटिव्ह पार्टी सत्तेमध्ये आहे. पण, यावेळी कंझर्व्हेटिव्ह पार्टीची सत्ता डळमळीत होण्याची शक्यता आहे.

बहुमतासाठी ३२६ जागा आवश्यक

ब्रिटनमधे देखील जवळपास भारतासारखीच निवडणूक प्रक्रिया असते. दुसर्‍या शब्दात भारताच्या निवडणूक प्रक्रियेवर ब्रिटनचा प्रभाव आहे. 'फर्स्ट पास्ट द पोस्ट' म्हणजे ज्या उमेदवाराला सर्वाधिक मतं मिळतील तो विजयी होईल. यामध्ये विजयी उमेदवाराला ५० टक्क्यांपेक्षा जास्त मतं मिळण्याची आवश्यकता नाही. यूकेसह अनेक देशात अशाच पद्धतीने निवडणूक होत असते. मतदार एकाच उमेदवाराला मतदान करू शकतो.

ब्रिटनमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी ३२६ जागांची आवश्यकता असते. कोणत्या पक्षाला बहुमत मिळाले नाही तर 'हंग पार्लामेंट'ची स्थिती निर्माण होते. अशा स्थितीत ब्रिटनमध्ये सर्वाधिक जागा असणारा पक्ष सरकार स्थापन करतो. पण, कायदे करताना सरकारला दुसर्‍या पक्षाच्या मतांची आवश्यकता लागते. दुसऱ्या पक्षाच्या मदतीशिवाय सरकार कायदे करू शकत नाही. महायुती किंवा महाआघाडीचे सरकार बनवले जाऊ शकते.

ब्रिटनमध्ये दोन सभागृह

ब्रिटनमध्ये देखील संसदेचे दोने सभागृह असतात. एकाला हाऊस ऑफ कॉमन (House of Commons) म्हणतात, ज्यात ६५० सदस्य असतात. दुसऱ्याला हाऊस ऑफ लॉर्डस म्हणतात (House of Lords) यात एकूण ७८४ सदस्य असतात. यातील ९२ सदस्य हे वंश परंपरेनुसार येत असतात. भारतात जसे राष्ट्रपती असतात तसेच ब्रिटनमध्ये देशाचा प्रमुख राजा असतो.

राजकीय पक्ष

सध्या ब्रिटनमध्ये कंझर्व्हेटिव्ह पार्टीचे सरकार आहे. याचे नेतृत्व पंतप्रधान ऋषी सुनक करत आहेत. या पार्टीला २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत ३६५ जागा मिळाल्या होत्या. कंझर्व्हेटिव्ह पार्टीची विचारधारा ही सेंटर राईट आहे.

दुसरीकडे, लेबर पार्टी विरोधात आहे. या पार्टीने २०१९ मध्ये २०२ जागा मिळवल्या होत्या. या पार्टीचे नेतृत्व कीर स्टार्मर करत आहेत. या पार्टीचे विचारधारा सेंटर लेफ्ट आहे. लेबर पार्टीची स्थापना कामगार प्रतिनिधी सभेच्या माध्यमातून झाली होती.

लिबरल डेमोक्रेट्स नावाचा आणखी एक पार्टी ब्रिटनमध्ये आहे. या पक्षाला २०१९ मध्ये ११ जागा मिळाल्या होत्या. या पार्टीची विचारधारा सेंटर लेफ्ट आहे. पण, २०१०-१५ या काळामध्ये लिबरल डेमोक्रेट्स पार्टी कंझर्व्हेटिव्हसोबत सत्तेमध्ये होती.

rishi sunak
Rishi Kapoor: 'ज्यांच्यावर आपण प्रेम करतो ते आपल्याला सोडून जात नाहीत'; ऋषी कपूर यांच्या आठवणीत लेक अन् पत्नी भावूक

हिंदूंची भूमिका महत्त्वाची

यूनायटेड किंगडममध्ये हिंदूंची एकूण संख्या जवळपास १० लाख आहे. या लोकांना आपल्याकडे वळवण्यासाठी राजकीय नेत्यांचे प्रयत्न सुरु असतात. ऋषी सुनक यांनी हिंदू मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. काही दिवसांपूर्वी सुनक BAPS स्वामी नारायण मंदिरात गेले होते. त्यानंतर त्यांचे प्रतिस्पर्धी कीर स्टार्मर यांनी देखील हिंदू मंदिराला भेट दिली होती. हिंदू वोट बँक आपल्याकडे वळवण्याचा दोन्ही नेत्यांचा प्रयत्न होता.

निवडणुकीचा मुद्दा काय आहे?

ब्रिटनमध्ये निवडणुकीत अनेक मुद्दे चर्चेत आहेत. त्यातीत सर्वात महत्त्वाचा मुद्दा अर्थव्यवस्थेचा आहे. महागाई वाढली आहे. The polling company YouGov च्या सर्व्हेनुसार, लोकांनी ५२ टक्के अर्थव्यवस्थेला निवडणुकीचा मुद्दा मानला आहे. काही प्रमाणात आरोग्याचा मुद्दा महत्त्वाचा मानला जात आहे. दरम्यान, निवडणुकीत कोण बाजी मारतं हे पाहावं लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.