कोव्हॅक्सिनचा मंजूर लशींमध्ये समावेश; UK सरकारचा निर्णय

Covaxin
CovaxinSakal
Updated on
Summary

२२ नोव्हेंबरपासून भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस घेतलेल्या प्रवाशांना इंग्लंडमध्ये गेल्यानंतर क्वारंटाइन रहावं लागणार नाही.

भारताच्या कोव्हॅक्सिन लशीला परवानगी नसल्याचे कारण देत अनेक देशांनी ही लस घेतलेल्या नागरिकांना प्रवेश नाकारला होता. आता युकेला जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. कोव्हॅक्सिन लस घेतलेल्या नागरिकांचा युकेला जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. युकेमध्ये प्रवेशासाठी आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी घेतलेल्या लशींच्या यादीमध्ये कोव्हॅक्सिनचा समावेश करण्यात येणार आहे. २२ नोव्हेंबरपासून भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस घेतलेल्या प्रवाशांना इंग्लंडमध्ये गेल्यानंतर क्वारंटाइन रहावं लागणार नाही.

भारतात इंग्लंडचे उच्चायुक्त एलिस यांनी सोमवारी ट्विटरवर सांगितलं की, युकेमध्ये भारतीय प्रवाशांसाठी आणखी चांगली बातमी आहे. २२ नोव्हेंबरुासून ज्या प्रवाशांनी कोव्हॅक्सिन लस घेतली आहे त्यांना क्वारंटाइन राहण्याची गरज नाही.

Covaxin
Taliban Issue: भारताची बैठक; चीन-पाकचा नकार तर इराण-रशिया राहणार उपस्थित

जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळालेल्या लशींचा समावेश इंग्लंडकडून त्यांच्या यादीमध्ये केला जातो. भारतात कोविशील्डनंतर कोव्हॅक्सिन लस घेतलेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. याआधी कोव्हॅक्सिन लस घेतलेल्या नागरिकांना इंग्लंडमध्ये गेल्यानंतर क्वांरटाईन रहावं लागत होतं. मात्र २२ नोव्हेंबरपासून क्वारंटाइनचे नियम नसतील.

याआधी कोविशिल्डला गेल्याच महिन्यात युकेने त्यांच्या यादीत समाविष्ट केले होते. जागतिक आरोग्य संघटनेने कोव्हॅक्सिनला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिल्यानंतर आतंरराष्ट्रीय प्रवासामध्ये वाढ झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.