Heat Wave : ब्रिटनमध्ये उष्णतेचा तांडव; हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी

येत्या काही दिवसांत उष्णतेपासून दिलासा मिळण्याऐवजी त्याचा त्रास आणखी वाढू शकतो
UK Heat Wave
UK Heat Wave
Updated on
Summary

येत्या काही दिवसांत उष्णतेपासून दिलासा मिळण्याऐवजी त्याचा त्रास आणखी वाढू शकतो

UK Heat Wave : ब्रिटनमध्ये तापमानाने पहिल्यांदाच 40 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे सध्या ब्रिटनमध्ये उष्णतेचा तांडव पहायला मिळत आहे. या उष्णतेचा त्रास आता दक्षिण-पूर्व इंग्लंडमध्ये 39 अंशांवर पोहोचला असल्याने नागरिकांच्या जीवनावर याचा परिणाम जाणवू लागला असून आरोग्यासाठी हे हवामान घातक असल्याचे बोलले जात आहे. मंगळवारी दक्षिण पश्चिम लंडनमध्ये तापमान 40.2 वर पोहोचले होते.

ब्रिटनमध्ये पारा आजपर्यंत कधीच चढला नव्हता. सध्याचे तापमान पाहता ते 104.4 °F पर्यंत पोहोचले आहे. यामुळे 2019 मधील 101.6°F चा पूर्वीचा विक्रम मोडून काढला आहे. त्यामुळे हा दिवस आतापर्यंत देशातील सर्वात उष्ण दिवस ठरला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत उष्णतेपासून दिलासा मिळण्याऐवजी त्याचा त्रास आणखी वाढू शकतो, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

UK Heat Wave
तुम्हाला माहिती आहे का? नवीन राष्ट्रपती 25 जुलैलाच का शपथ घेतात?

दरम्यान, देशाच्या अनेक भागांतून वेगवेगळ्या वेळी तापमानाची नोंद केली जात आहे. त्यामुळे खरा आकडा खूप मोठा असू शकतो, असे सांगण्यात आले आहे. लंडनमध्ये रात्रीचे तापमानही 26 अंश सेल्सिअस नोंदवले जात असून लंडनचे हवामान बहुतेक रात्री थंड किंवा आल्हाददायक असते, परंतु यावर्षी त्यात मोठा बदल झाला आहे. ब्रिटनमध्ये या उन्हाळ्यात तांडव सुरू असल्याने नागरिक नाराज आहेतच, पण वाहतूक सुविधाही कोलमडली आहे. वाहतूक सचिव ग्रँट शॅप्स यांच्या मते, ब्रिटनची रेल्वे ही उष्णता सहन करण्याइतकी प्रगत नाही.

सध्याची परिस्थिती अशी आहे की, कडक उन्हामुळे हवामान खात्याला अनेक भागांसाठी रेड अलर्ट जारी करावा लागला आहे. सध्या उत्तर आणि दक्षिण लंडनच्या अनेक भागात रेड अलर्ट सुरू असून, उष्णतेमुळे लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. मोठी गोष्ट म्हणजे या कडक उन्हापासून वाचण्यासाठी पाच जणांनी नदीच्या साहाय्याने दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला, मात्र ते सर्वजण बुडाले.

UK Heat Wave
बारामतीकरांचं राज्य संपलंय, आता तरी नीट वागा; आमदार शिंदेंचा शरद पवारांना टोला

रेल्वे वाहतूकशिवाय या उष्णतेचा परिणाम विमानतळावर स्पष्टपणे दिसून येत आहे. उष्णतेमुळे ल्युटन विमानतळाच्या धावपट्टीवर परिणाम झाला आहे. त्याचप्रमाणे रॉयल एअर फोर्सलाही धावपट्टीवर तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. रुग्णालय आणि रुग्णसेवेवरही ताण वाढला असून, उष्णतेच्या लाटेमुळे संपूर्ण यंत्रणा कोलमडली आहे. अनेक शाळा बंद करण्याची घोषणाही करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.