वाहतुकीचे नियम पाळणं हे सर्वांसाठी महत्वाचं आणि बंधनकारक आहे. जर तुम्ही नियम तोडले आणि वाहतूक पोलिसांच्या तावडीत सापडलात तर काय होतं हे वेगळं सांगण्याची गरज नाही. पण तब्बल ७० वर्षांहून अधिक काळांपासून वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या एका पठ्ठ्याची गोष्ट ऐकून तुम्ही आवाक् व्हाल! हो कारण पोलिसही त्याचा कारनामा ऐकून आवाक् झालेत. (UK man says he has been driving uninsured and without licence for more than 70 years aau85)
ही घटना युकेमधली असून नॉटिंगहॅम येथील बुलवेल येथे गस्तीवर असलेल्या अधिकाऱ्यांनी टेस्को एक्स्ट्राजवळ एका ड्रायव्हरला अडवलं आणि त्याच्याकडे चौकशी केली. तेव्हा त्यानं पोलिसांनी अशी माहिती दिली की पोलिसही आवाक् झाले. त्यानं सांगितलं की, आपला जन्म सन १९३८ मधील असून वयाच्या १२ वर्षांपासून गेल्या सत्तर वर्षांहून अधिक काळापासून लायसन्स आणि इन्शुरन्सविना मी ड्रायव्हिंग करत आहे. या सत्तर वर्षांच्या काळात त्याला पोलिसांनी एकदाही रोखलं नाही. त्याला कारणही तसंच आहे की सुदैवानं माझ्या हातून एकदाही अपघात घडलेला नाही.
दरम्यान, बुलवेल पोलिसांनी यासंदर्भात फेसबूक पोस्ट लिहिली असून यामध्ये या घटनेबाबत तपशीलवार माहिती दिली आहे. पोलिसांनी पुढे असंही म्हटलं की, "नॉटिंगहॅममध्ये एएनपीआर (स्वयंचलित नंबर प्लेट ओळख) कॅमेऱ्यांची संख्या वाढवल्यानं वाहनांच्या अगदी लहानसहान हालचालीही कॅमेरॅमध्ये सहज टिपल्या जातात. त्यामुळं तुमची कागदपत्रे व्यवस्थित असल्याची खात्री करा, कारण एक दिवस तुमचाही असेल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.