UK: यूकेतील गुरुद्वाराकडून खलिस्तानवाद्यांचा निषेध; भारतीय उच्चायुक्तांना नाकारला होता प्रवेश

Glasgow Gurudwara
Glasgow Gurudwara
Updated on

नवी दिल्ली- युनायटेड किंगडममधील भारताचे राजदूत विक्रम दोराईस्वामी यांना काही खलिस्तान समर्थकांनी गुरुद्वारामध्ये प्रवेश नाकारल्याची घटना घडली होती. यावरुन भारताने यूके सरकारकडे तीव्र नाराजी व्यक्त केली होती. ब्रिटनमधील स्कॉटलँडच्या ग्लासगोव गुरुद्वारा परिसरात हा प्रकार घटला होता. याप्रकरणी ग्लासगोव गुरुद्वाराकडून प्रतिक्रिया आली असून या घटनेचा प्रशासनाकडून निषेध व्यक्त करण्यात आलाय. (Glasgow Gurudwara strongly condemns such disorderly behaviour Scotland)

ग्लासगोव गुरुद्वाराच्या सरचिटणीस प्रभाजोत कौर यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. ही घटना २९ सप्टेंबर रोजी घडली. भारतीय उच्चायुक्त गुरुद्वाराला भेट देणार होते. पण, काही अज्ञात लोकांनी त्यांना प्रवेश करण्यापासून रोखले. त्यानंतर उच्चायुक्त आणि त्यांचे अधिकारी यांनी तेथून निघून जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या समाजकंटकांनी गुरुद्वाराच्या सदस्यांशीही हुज्जत घातली, असं त्या म्हणाल्या.

Glasgow Gurudwara
Fact Check : भारतीय पोस्ट ऑफिसची 'लकी ड्रॉ' ऑफर, मोफत मिळतोय आयफोन 15? काय आहे सत्य?

स्कॉटिश पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. शीखांच्या धार्मिक स्थळी अशा प्रकारची अशांतता निर्माण करण्याच्या कृतीचा ग्लासगोव गुरुद्रारा तीव्र निषेध करते. गुरुद्वारात वेगवेगळ्या धर्मातील सर्व लोकांना प्रवेश आहे. त्यांची कोणतेही पार्श्वभूमी असली तरी सर्वांना स्थान आहे. आम्ही आमच्या विश्वासानुसार सर्वांचे स्वागत करतो, असं प्रभाजोत कौर यांनी स्पष्ट केलं.

भारताचे उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी ग्लासगोव येथील गुरुद्वारा येथे गेले होते. यावेळी त्यांचा ताफा दोन मूलतत्ववाद्यांनी रोखला. त्यांच्या कारजवळ जाऊन दरवाजा उघडण्याचा एकाने प्रयत्न केला. दोराईस्वामी यांनी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत तिथून निघून जाण्याचा निर्णय घेतला.

Glasgow Gurudwara
Nanded News : गुरुद्वारा सचखंड बोर्डाने घेतली विकासाची झेप!

'शीख फॉर यूके' या सोशल मीडिया हँडलवरुन या घटनेचा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. कॅनडामध्ये शीखांना त्रास दिला जात आहे. त्यामुळे भारतीय राजदूतांना आणि इतरांना अशीच वागणूक दिली जायला हवी असं व्हिडिओच्या कॅपशनमध्ये म्हणण्यात आलं होतं. दरम्यान, यूकेने या घटनेतील दोषींवर कारवाईचा निर्णय घेतला आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.