नवी दिल्ली- यूकेमधील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर झाली आहे. यामध्ये किंग चार्ल्स यांच्यापेक्षा पंतप्रधान ऋषी सुनक आणि त्यांच्या पत्नी अक्षता मूर्ती या श्रीमंत असल्याचं समोर आलं आहे. दाम्पत्याच्या संपत्तीमध्ये गेल्यावर्षीपेक्षा वाढ झाली आहे. किंग चार्ल्स यांची मागील वर्षी एकूण संपत्ती ६०० मिलियन यूरो होती होती, ती आता ६१० मिलियन यूरो झाली आहे.
२०२२ मध्ये सुनक दाम्पत्य दिवंगत राणी एलिझाबेथ II पेक्षा श्रीमंत होते. राणीची संपत्ती त्यावेळी जवळपास ३७० मिलियन यूरो इतकी होती. यूके सध्या आर्थिक संकटातून जात आहे. लोकांचा दैनंदिन वस्तुंवरील खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. एका डेटानुसार, मागील वर्षीय विक्रमी ३.१ मिलियन फूड पार्सल वाटण्यात आले आहेत. यूकेमध्ये महागाई वाढत असल्याचं हे निदर्शक आहे.
सन्डे टाइम्स रीच लिस्टमध्ये सांगण्यात आलंय की, ऋषी सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती यांची खासगी संपत्ती मागच्या वर्षीच्या तुलनेत १२२ मिलियन यूरोंनी वाढली आहे. दोन्ही दाम्पत्याकडे मिळून २०२३ मध्ये ५२९ मिलियन यूरो संपत्ती होती, आता त्यांची संपत्ती ६५१ मिलियन यूरो झाली आहे. अक्षता मूर्तींच्या इन्फोसिसमधील हिस्सेदारीमुळे ही संपत्ती वाढली आहे. अक्षता मूर्ती यांचे वडील नारायण मूर्ती बलाढ्य आयटी कंपनी इन्फोसिसचे सहसंस्थापक आहेत.
सुनक हे माजी हेड्ज फंड मॅनेजर राहिलेले आहेत. शिवाय सुनक यांचे ६.५ टक्के उत्पन्न केवळ गुंतवणुकीमधून येते. इतर उत्पन्न खासदार असल्यामुळे मिळणारे ९१,३४६ यूरो वेतन, तसेच पंतप्रधान पदासाठी मिळणारे अधिकचे ८०,८०७ यूरो येथून येते. एकंदरीत सुनक यांच्या कुटुंबामध्ये मूर्ती या सर्वात श्रीमंत सदस्य आहेत.
१. गोपी हिंदुजा – £३७.२bn
२. सर लिओनार्ड ब्लावॅटनिक - £२९.२५ अब्ज
३. डेव्हिड आणि सायमन रुबेन आणि कुटुंब – £२४.९bn
४. सर जिम रॅटक्लिफ – £२३.५bn
५. सर जेम्स डायसन आणि कुटुंब – £२०.८bn
६. बर्नाबी आणि मर्लिन स्वायर आणि कुटुंब – £१७.२bn
७. इदान ऑफर – £१४.९bn
८. लक्ष्मी मित्तल आणि कुटुंब – £१४.९bn
९. गाय, जॉर्ज, ॲलाना आणि गॅलन वेस्टन आणि कुटुंब – £१४.४bn
१०. जॉन फ्रेड्रिक्सन आणि कुटुंब – £१२.८bn
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.