Rishi Sunak : ऋषी सुनक यांच्या पक्षात पडझड, तब्बल ७८ खासदारांनी दिले राजीनामे; काय आहे कारण?

rishi sunak
rishi sunak esakal
Updated on

नवी दिल्लीः ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पक्षामध्ये भूकंप झाला आहे. त्यांच्या पक्षाच्या तब्बल ७८ खासदारांनी पराभवाच्या भीतीने राजीनामे दिले आहेत. वेळेपूर्वीच निवडणुका जाहीर केल्याने पक्षामध्ये नाराजी असल्याचं दिसून येतंय.

ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाच्या ७८ खासदारांनी राजीनामा दिल्याने ब्रिटनमध्ये खळबळ उडाली आहे. जनतेतली नाराजी आणि पक्षांतर्गत नाराजींना सुनक यांना सामोरे जावे लागत आहे. निवडणुकीमध्ये पक्षाला पराभवाचं तोंड बघावं लागेल, असा अंदाज आल्याने राजीनामा सत्र सुरु असल्याचं म्हटलं जातंय.

कॅबिनेट मंत्री अँर्डिया लीडसम आणि मिशेल गोव्ह यांना राजीनामा दिला असून निवडणूक लढवणार नसल्याचंही जाहीर केलं आहे. यासह माजी संरक्षण मंत्री यांनीही निवडणुकीतून माघार घेतली आहे.

rishi sunak
Pune News : विद्यार्थिनींचा मानसिक छळ अन् दुर्व्यवहार प्रकरणी 'एनएसयूआय' संघटनेच्या अध्यक्षाविरोधात गुन्हा दाखल

मागच्या १४ वर्षांपासून हुजूर पक्ष सत्तेमध्ये आहे. विद्यमान सरकारचा काळ जानेवारी २०२५ पर्यंत होता. परंतु सात महिने अगोदर निवडणुका घेण्यात येत आहेत. त्याचं कारण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाला मोठं अपयश मिळालं होतं. तसेच देशामध्ये वाढत असलेली महागाई, घसरलेली अर्थव्यवस्था यामुळे हुजूर पक्षात नाराजी आहे.

rishi sunak
Pune Porsche accident : पुणे अपघात प्रकरणात रॅप साँग करणारा आर्यन म्हणतो, मी मिडल क्लास असल्यामुळे...

विरोधी मजूर पक्षाची ब्रिटनमध्ये हवा आहे. वेगवेगळ्या सर्व्हेमध्ये हुजूर पक्ष मागे पडत असल्याचं दिसून येतंय. त्यामुळेच पंतप्रधान ऋषी सुनक यांनी मध्यावधी निवडणुका जाहीर केल्या आहेत. त्यामुळे नाराज झालेल्या पक्षाच्या ७८ खासदारांनी राजीनामे दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.