महिलेवर भीषण वर्णद्वेषी हल्ला; डोक्यावरील त्वचेसह केस उपटले!

या घटनेची जगभरतील माध्यमांनी दखल घेतली असून यावर सध्या चर्चा झडत आहेत.
racism
racism
Updated on

लंडन : जगभरात वर्णद्वेषाची (Racism) वृत्ती अद्यापही लोकांच्या मनातून हद्दपार झालेली नाही. पाश्चात्य देशांमध्ये अद्यापही वर्णद्वेषातून हल्ल्यांच्या घटना वारंवार समोर येत आहेत. नुकतीच ब्रिटनमध्ये अशीच एक भीषण घटना समोर आली आहे. यामध्ये वर्णद्वेषातून एका पुरुषानं महिलेवर हल्ला चढवला, त्यानं या महिलेच्या डोक्यावरील केस इतक्या जोरात ओढले की, डोक्यावरील त्वचा फाटल्यानं ती गंभीर जखमी झाली आहे. (UK Woman hair ripped from scalp in racially aggravated attack in London)

racism
Jayprabha : '20 वर्षांपूर्वी माझ्या वडिलांनी दिलेला आत्मदहनाचा इशारा'

पोलिसांच्या माहितीनुसार, लंडनमध्ये हा भीषण प्रकार घडला असून एका ३१ वर्षीय महिलेवर हा प्रसंग ओढवला आहे. यामध्ये पोलिसांनी हल्लेखोर पुरुषांचा एक फोटो प्रसिद्ध केला आहे. ही घटना १८ डिसेंबर २०२१ रोजी दक्षिण लंडनमधील इस्ट क्रॉयडॉन रेल्वे स्टेशनवर घडली. जेव्हा या महिलेवर हल्ला झाला तेव्हा ती ११९ या क्रमांकाच्या बसमधून रेल्वेस्टेशनवर उतरली होती.

racism
तुमच्या राज्यात जगायचं नाही, सरकारला... : अण्णा हजारे

स्कॉटलंड यार्ड पोलिसांच्या माहितीनुसार, हल्लेखोर तरुणांनं महिलेचे केस इतक्या जोरात ओढले की तिची टाळू फाटून केस हातात आले त्यानंतर हल्लेखोरानं महिलेच्या डोक्यात मागून जोरदार प्रहार करुन तिला खाली पाडलं, गार्डियननं आपल्या वृत्तात असं म्हटलं आहे. या भीषण हल्ल्यात पीडित महिलेच्या चेहऱ्यावरही मोठी जखम झाली आहे. याप्रकरणी प्रतिक्रिया देताना डिटेक्टिव्ह कॉन्स्टेबल बेकी ह्युग्ज म्हणाले, "हिंसक गुन्हे विशेषतः महिला आणि मुलींविरोधातील गुन्ह्यांना हाताळणं ही आमची प्राथमिकता आहे. पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या हल्लेखोराचा फोटो पाहून त्याची जर कोणाला माहिती असेल तर संबंधितांनी ब्रिटन पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहनही करण्यात आलं आहे.

अमेरिकेत जॉर्ज फ्लॉईडचं प्रकरण गाजलं

दरम्यान, २५ मे २०२० मध्ये जॉर्ज फ्लॉईड (George Floyd) नामक ४६ वर्षीय अफ्रिकन व्यक्तीचा एका अमेरिकन पोलिसानं वर्षद्वेषातून छळ करुन हत्या केली होती. भर रस्त्यात फ्लॉईडला खाली पाडत त्याच्या मानेवर गुडघा दाबून त्याचा ४४ वर्षीय डेरेक चॉविन नामक पोलिसानं अमानुष छळ केला होता. या घटनेचे फोटोही माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले होते. 20 डॉलरचे बनावट बिल वापरल्याच्या संशयावरून फ्लॉइडला अटक करण्यात आली होती, त्यानंतर वर्षद्वेषातून त्याला मारहाण झाली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा जगभरातून निषेध करण्यात आला होता. स्थानिक कोर्टात काही महिन्यांमध्ये आरोपी पोलिसाविरोधात फास्टट्रॅक खटला चालवत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.