बेलारुसमध्ये होणार रशिया-युक्रेन चर्चा; रशियन मीडियाची माहिती

युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये बेलारुस या देशात चर्चा होणार आहे.
Putin_Zelensky
Putin_Zelensky
Updated on

मॉस्को : युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशिया आणि युक्रेन (Ukraine-Russian War) यांच्यामध्ये बेलारुस या देशात चर्चा होणार आहे. बेलारुस (Belarus) इथं चर्चेला यापूर्वी युक्रेननं नकार दिला होता त्यानंतर आता युक्रेननं यावर सहमती दर्शवली आहे, असं रशियनं मीडियानं म्हटलं आहे. (Ukraine agrees to hold talks with Russia in Belarus Moscow)

यापूर्वीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की हे रशियाची चर्चेसाठी तयार झाले होते. पण ही चर्चा बेलारुसमध्ये व्हावी ही रशियाची मागणी त्यांनी फेटाळून लावली होती. कारण युक्रेनवर आक्रमणासाठी बेलारुस एक मंच ठरलं होतं.

Putin_Zelensky
युक्रेन शेजारील देशांना परराष्ट्र मंत्र्यांचा फोन; भारतीय विद्यार्थ्यांना मदतीची केली विनंती

झेलेन्स्की यांनी रविवारी सकाळी प्रेसीडेंसी वेबसाइटवर पोस्ट केलेल्या निवेदनात म्हटलं होतं की, "युक्रेन आणि रशियामधील बैठकीबद्दल आम्ही बरीच चर्चा ऐकली आहे, ज्यामुळं हे युद्ध संपुष्टात येईल आणि आमच्यात पुन्हा शांतता प्रस्थापित होईल. बर्‍याचदा बेलारुसचा उल्लेख मिन्स्क कराराच्या वाटाघाटींचे ठिकाण म्हणून केला जातो. चर्चेसाठी आम्ही युक्रेन किंवा बेलारुस निवडलं नव्हतं ते रशियान निवडलं होतं.

रशियानं युक्रेनवर केलेल्या आक्रमणात बेलारूस कारणीभूत ठरला आहे. युक्रेनियन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार बेलारूस सरकारच्या पाठिंब्याने रशियन सैन्याने बेलारूस सीमेवरून आक्रमण केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.