युक्रेनवर कधीही हल्ला होऊ शकतो : ज्यो बायडेन

युक्रेनवरील हल्ल्याची योजना रशियाने प्रत्यक्षात आणली तर हा युद्धाचा विनाशकारी व अनावश्‍यक निर्णय त्यांना जबाबदार धरले जाईल.
Ukraine Attack
Ukraine AttackSakal
Updated on

वॉशिंग्टन : युक्रेनवर आक्रमण करण्याच्या तयारीत रशिया आहे. पुढील आठवड्यात रशियाच्या फौजा कीवसह युक्रेनवर हल्ला (Attack On Ukraine) करतील, हे ठामपणे सांगू शकतो आणि त्यामागे कारणही आहे, असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन (Joe Biden) यांनी शुक्रवारी केला. (Global News Updates)

युक्रेनवरील हल्ल्याची योजना रशियाने (Russia) प्रत्यक्षात आणली तर हा युद्धाचा विनाशकारी व अनावश्‍यक निर्णय त्यांना जबाबदार धरले जाईल. आक्रमण झाल्यास रशियावर कडक निर्बंध लादण्याची आमची तयारी आहे, असा इशारा बायडेन यांनी दिला. रशियाच्या तयारीची पक्की माहिती गुप्तचर विभागाकडून मिळाली आहे, असे बायडेन यांनी सहकारी देशांच्या अध्यक्षांशी चर्चा केल्यानंतर सांगितले. रशिया- युक्रेन संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर बायडेन यांच्या दाव्याने खळबळ उडाली आहे.

व्हाइट हाउसमधील रुझवेल्ट रूममधून माध्यमांच्या प्रतिनिधींना माहिती देताना ते म्हणाले, रशिया आगामी काळात युक्रेनची राजधानी कीववर पहिला हल्ला करेल, हे ठामपणे सांगण्यामागे सबळ कारण आहे. कीवमधील २८ लाख निष्पाप नागरिकांचा जीव यामुळे धोक्यात येणार आहे. पण युक्रेनवर हल्ल्याचे समर्थन करणारे कारण रशियाला देता येऊ नये, यासाठी आम्ही आमच्या अधिकारात सर्वकाही करेल आणि रशियाला आक्रमणापासून रोखण्याचा प्रयत्न करू. ‘नाटो’च्या अखत्यारितील जमिनीच्या प्रत्येक इंचाचे आणि आमच्या सामूहिक सुरक्षेचे कोणत्याही धोक्यापासून रक्षण करण्यास अमेरिका आणि तिचे सहकारी देश तयार आहेत, असेही बायडेन म्हणाले. अमेरिकेने युद्धाच्या तयारीने युक्रेनमध्ये सैन्य पाठविले असल्याच्या वृत्ताचा त्यांनी इन्कार केला, पण तेथील नागरिकांना अमेरिकेचा कायम पाठिंबा असेल, अशी ग्वाही दिली.

परराष्ट्र मंत्र्यांची बैठक होणार

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन व रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गी लावरोव्ह हे चर्चा करणार आहेत, असे सांगत बायडेन म्हणाले जर त्याआधीच रशियाने सैनिकी कारवाई केली तर राजनैतिक चर्चेसाठी त्यांनी दरवाजे बंद केले असा त्याचा अर्थ होऊ शकेल.

कडक निर्बंध लादणार

रशियाने युक्रेनवरील हल्ल्याची योजना अमलात आणली तर संकटाला निमंत्रण देत अनावश्‍यक युद्धाच्या खाईत लोटल्याबद्दल त्यांना जबाबदार धरले जाईल. आक्रमण झाल्यास रशियाला त्याची किंमत चुकवावी लागेल. अमेरिका व सहकारी देश त्यांच्यावर कडक निर्बंध लादण्याच्या तयारीत आहेतच, शिवाय जगभरात उमटणाऱ्या नैतिक आक्रोशही त्यांच्यावर लादला जाईल, असा इशारा बायडेन यांनी केला. रशियाने राजनैतिक धोरण स्वीकारण्याची व चर्चेतून वाटाघाटी करण्यास पुढे यायला हवे, अशी अपेक्षाही व्यक्त केली

भारतीयांना आणण्यास विमाने जाणार

नवी दिल्ली : युक्रेन व रशिया यांच्यातील युद्धजन्य स्थिती अतिगंभीर झाल्याच्या व रशिया कोणत्याही क्षणी युक्रेनवर हल्ला करणार अशा शक्यतेच्या पार्श्वभूमीवर भारताने युक्रेनची राजधानी कीवमध्ये राहणाऱ्या १८ हजार विद्यार्थ्यांसह अन्य भारतीयांना माघारी आणण्यासाठी पहिल्या टप्प्यात २२, २४ व २६ फेब्रुवारीला विशेष विमाने सोडण्याचा निर्णय आज घेतला. एअर इंडियाने ट्विट करून याची माहिती दिली. दिल्ली व कीव यांच्यादरम्यान ही विमाने सोडण्यात येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.