Moscow Concert Hall Attack: रशियातील दहशतवादी हल्ल्याचं युक्रेनशी कनेक्शन? पुतीन सरकारचा आरोप; ११ जण ताब्यात

Moscow concert hall attack: या हल्ल्यातील मृतांची संख्या 133 वर पोहोचली आहे. रशियाच्या सर्वोच्च तपास संस्थेने शनिवारी ही माहिती दिली. गोळीबारानंतर हल्लेखोरांनी हॉल पेटवून दिला.
Moscow Concert Hall Attack
Moscow Concert Hall AttackEsakal
Updated on

Moscow concert hall attack: रशियाच्या मॉस्कोमध्ये भीषण हल्ला झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाच हल्लेखोरांनी एका कार्यक्रमासाठी जमलेल्या लोकांवर अंदाधूंद गोळीबार केला आहे.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी काल (शनिवारी) सांगितले की, राजधानी मॉस्कोमधील कॉन्सर्ट हॉलवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी 11 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या हल्ल्यातील मृतांची संख्या 133 वर पोहोचली आहे. रशियाच्या सर्वोच्च तपास संस्थेने शनिवारी ही माहिती दिली. गोळीबारानंतर हल्लेखोरांनी हॉल पेटवून दिला. इस्लामिक स्टेट या दहशतवादी गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असली तरी हा हल्ला युक्रेनशी संबंधित असल्याचे रशियन सुरक्षा यंत्रणांचे मत आहे.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी राष्ट्राला उद्देशून दिलेल्या भाषणात सांगितले की, अधिकाऱ्यांनी या हल्ल्यात थेट सहभागी असलेल्या चौघांसह 11 जणांना ताब्यात घेतले आहे. हल्लेखोर सीमा ओलांडून युक्रेनच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, युक्रेनने या हल्ल्यात आपला सहभाग नसल्याचे म्हटले आहे. पुतिन यांनी या हल्ल्याला रानटी दहशतवादी कृत्य म्हटले आहे.

Moscow Concert Hall Attack
Moscow Attack: इस्लामिक स्टेटचा हल्ला पुतिन घेणार बदला! मॉस्को हल्ल्याबाबत आतापर्यंत काय माहिती आहे?

इस्लामिक स्टेटने घेतली जबाबदारी

इस्लामिक स्टेट गटाने सोशल मीडियावर संलग्न चॅनेलवर शेअर केलेल्या निवेदनात या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. इस्लामिक स्टेट गटाने त्यांच्या अमाक वृत्तसंस्थेने शेअर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की त्यांनी मॉस्कोच्या बाहेरील क्रॅस्नोगोर्स्क येथे ख्रिश्चनांच्या मोठ्या मेळाव्यावर हल्ला केला आणि शेकडो लोक मारले आणि जखमी केले.

या दाव्याची सत्यता तपासता आलेली नाही, परंतु अमेरिकेच्या गुप्तचर अधिकाऱ्याने असोसिएटेड प्रेसला सांगितले की, अफगाणिस्तानमधील इस्लामिक स्टेट गटाची शाखा मॉस्कोमध्ये हल्ल्याचा कट रचत असल्याचे अमेरिकन गुप्तचर संस्थेला कळले होते आणि त्यांनी रशियन अधिकाऱ्यांसोबत काम केले होते. माहिती शेअर केली होती.

Moscow Concert Hall Attack
मालदीवचे अध्यक्ष आले वठणीवर! भारताने कर्जाची परतफेड करण्याची मागणी करताच म्हणतात...

युक्रेन कनेक्शन

रशियाच्या तपास समितीने सांगितले की, चार संशयितांना पश्चिम रशियाच्या ब्रायन्स्क भागात पकडण्यात आले. हा भाग युक्रेनच्या सीमेपासून फार दूर नाही. 'तास' या वृत्तसंस्थेने रशियाच्या एफएसबीचा हवाला देत म्हटले आहे की, चौघांनी सीमा ओलांडून युक्रेनमध्ये जाण्याची योजना आखली होती आणि तेथे त्यांचे संपर्क होते.

Moscow Concert Hall Attack
PM Modi : पंतप्रधान मोदींना भूतानमध्ये मिळालेला ‘ऑर्डर ऑफ ड्रूक ग्यालपो’ पुरस्कार का आहे खास?

रशियावर सर्वात मोठा दहशतवादी हल्ला

गेल्या दोन दशकांतील रशियामधील हा सर्वात भीषण दहशतवादी हल्ला मानला जात आहे. युक्रेनसोबत देशाचे युद्ध तिसऱ्या वर्षी सुरू असताना हा हल्ला झाला आहे. काही रशियन खासदारांनी हल्ल्यानंतर लगेचच युक्रेनकडे बोट दाखवले. युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांचे सल्लागार, मायखाइलो पोडोल्याक यांनी कोणताही सहभाग नसल्याचे म्हटले आहे. "युक्रेनने कधीही दहशतवादी पद्धती वापरल्या नाहीत," त्यांनी X वर पोस्ट केली आहे.

रशियन राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या क्रेमलिनने सांगितले की, हल्लेखोरांनी 'क्रोकस सिटी हॉल'वर हल्ला केल्यानंतर काही मिनिटांत पुतिन यांना याची माहिती देण्यात आली. हॉल मॉस्कोच्या पश्चिमेकडील काठावर असलेले एक मोठे संगीत ठिकाण आहे, ज्यामध्ये 6,000 पेक्षा जास्त लोक बसू शकतात. मॉस्कोच्या जवळ असलेल्या क्रासनोगोर्स्कमध्ये (Krasnogorsk) क्रोकस सिटी हॉलमध्ये रशियन रॉक ग्रुप पिकनिकचा (Piknik) कार्यक्रम होणार होता. याठिकाणी हा हल्ला झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.