Drone Attack : रशियातील प्रकल्पावर युक्रेनचा ड्रोन हल्ला

रशियातील एका तेल प्रकल्पावर युक्रेनने ड्रोनद्वारे हल्ले केले. या हल्ल्यांमुळे प्रकल्पात मोठी आग लागली आहे.
Ukraine drone attack on project in Russia
Ukraine drone attack on project in Russiasakal
Updated on

किव्ह - रशियातील एका तेल प्रकल्पावर युक्रेनने ड्रोनद्वारे हल्ले केले. या हल्ल्यांमुळे प्रकल्पात मोठी आग लागली आहे. युद्धसीमेपासून दूर अंतरावर असलेल्या या प्रकल्पावर हल्ला करण्यासाठी युक्रेनने मित्रदेशांनी पुरविलेल्या अत्याधुनिक ड्रोन विमानांचा वापर केल्याचा दावा केला जात आहे.

युक्रेनने मागील काही महिन्यांमध्ये रशियाच्या तेल प्रकल्पांना लक्ष्य करण्यास सुरवात केली आहे. रशियाच्या हल्ल्यांची तीव्रता कमी व्हावी, या उद्देशानेच ही मोहीम राबविली जात आहे. युक्रेनच्या पूर्वसीमेवर रशियाकडून पुन्हा एकदा सैन्याच्या हालचाली वाढल्या आहेत. युक्रेनला मात्र सैनिकांची आणि शस्त्रांची कमतरता भासत आहे. त्यामुळे मित्रदेशांनी दिलेल्या दीर्घपल्ल्याच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर युक्रेनकडून केला जात आहे.

युक्रेनने सोमवारी रात्री रशियाच्या रोस्तोव्ह प्रांतातील तेल प्रकल्पावर हल्ला केला. यामुळे मोठी आग लागून ती पाच हजार चौरस मीटर परिसरात पसरल्याचे रशियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या हल्ल्यामध्ये जीवितहानी झाली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com