Russia-Ukraine Crisis:वॅगनर प्रमुखाच्या मृत्यूमागे युक्रेनचा हात? राष्ट्रपती झेलेन्स्कींनी दिले स्पष्टीकरण

प्रिगोझिन यांचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. यात दुर्घटनेत युक्रेनचा हात असल्याचे आरोप त्यांच्यावर लागत होते.
Powerful countries including America have private army wagner coup vladimir putin regime strong yevgeny prighozin
Powerful countries including America have private army wagner coup vladimir putin regime strong yevgeny prighozinsakal
Updated on

Wagner Group:रशियामधील खासगी सुरक्षा संस्था 'वॅग्नर ग्रुप'चे प्रमुख येवगनी प्रिगोझिन यांच्या मृत्यूची बातमी समोर आली. प्रिगोझिन यांचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. यात दुर्घटनेत युक्रेनचा हात असल्याचे आरोप त्यांच्यावर लागत होते. मात्र, युक्रेनचे राष्ट्रपती वलोदिमिर झेलेन्स्की यांनी या दुर्घटनेत युक्रेनचा कोणताही हात नसल्याचे स्पष्ट केले आहे. याउलट त्यांनी रशियाला यासाठी जबाबदार धरले आहे.

झेलेन्स्की रशियाकडे बोट करत म्हणाले की, "या घटनेशी आमचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही, हे मी निश्चितपणे सांगू शकतो.मला वाटत की प्रत्येकाला माहिती आहे की याचा संबंध कोणाशी आहे."

वॅग्नर ग्रुप निर्माण करणाऱ्या प्रिगोझिन यांना बंडाआधी रशिया सरकारचं जवळचं मानलं जात होतं. वॅग्नर ग्रुपच्या सैनिकांनी रशियाच्या बाजूने रशिया-युक्रेन युद्धात भाग घेतला होता.मात्र, नंतर प्रिगोझिन यांनी रशिया सरकारवर सार्वजनिकरित्या ताशेरे ओढले होते. त्यांचा असा आरोप होता की रशिया सरकारच्या युद्ध शैलीमुळे वॅग्नर ग्रुपच्या अनेक जवानांना जीव गमवावा लागला.

जूनमध्ये, प्रिगोझिनने वॅगनरच्या दलाला मॉस्कोवर कूच करण्याचे आदेश दिले आणि रशियन सरकारविरुद्ध बंडखोरी जाहीर केली. बुधवारी मॉस्को येथे झालेल्या विमान अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला असून, खासगी लष्करी गट वॅगनर ग्रुपचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांचा मृतांमध्ये समावेश असल्याचे समजते. अपघाताच्या वेळी प्रिगोझिनचे वय ६२ होते.(Latest Marathi news)

Powerful countries including America have private army wagner coup vladimir putin regime strong yevgeny prighozin
''भंडाऱ्यात शरद पवारांच्या स्वागतासाठी मी जाणार, कार्यकर्त्यांनी सभेसाठी गर्दी करावी'' प्रफुल्ल पटेलांच्या विधानामुळे आश्चर्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.