किव्ह : युक्रेनवरील हल्ले रशियाकडून सुरुच आहेत. या दरम्यान दोन्ही देशांमध्ये शांतता वार्ता सुरु आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात त्यांनी रशिया व युक्रेन (Ukraine) दरम्यान सुरु असलेल्या शांतता वार्ताविषयी माहिती दिली आहे. झेलेन्स्की म्हणतात, की प्रत्येकाने काम करायला हवे. यात आमचे प्रतिनिधी, आमचे शिष्टामंडळ रशियन संघाशी वार्ता करित आहे. यातील चर्चा वास्तववादी असून त्यासाठी आणखीन वेळ लागेल. (Ukraine President Volodymyr Zelensky Say, Difficult To Peace Talks With Russia)
मात्र ते आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. कोणतेही युद्ध संपवायचे असेल तर त्यासाठी करार, सतत बैठका आवश्यक आहेत. वार्ता दरम्यानचा आवाज हा खरा आवाज आहे. निर्णय होण्यासाठी वेळ लागले पण तो युक्रेनच्या हिताचा असेल, असा विश्वास युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी व्यक्त केला आहे.
भारत रशियाकडून (Russia) सवलतीच्या दरात तेल खरेदी करणार आहे. त्यामुळे निर्बंधांचे भंग होत नाही. मात्र भारताने विचार करावा की आपण कोणत्या बाजूला उभे आहोत. याबाबतची नोंद इतिहासाच्या पुस्तकात होईल, असे अमेरिकेने म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.