Ukraine : राष्ट्राध्यक्ष झेलेंस्कीचं भाषण अनुवादित करताना कोसळलं रडू; व्हिडिओ व्हायरल

युक्रेनमधील ऑस्ट्रियाच्या राजदूतांनी शेअर केला व्हिडिओ
Volodymyr Zelensky
Volodymyr Zelensky
Updated on

कीव : रशियानं युक्रेनवर हल्ला (Russia Ukraine War) केल्यानंतर प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात झाली आहे. या हल्ल्यांमध्ये शेकडो लोकांचे जीव गेले आहेत. युद्धविरामासाठी दोन्ही देशांनी अद्याप चर्चेला सुरुवातही केलेली नाही. या युद्धादरम्यान असे काही फोटो समोर आले आहेत. ज्यामुळं युक्रेनप्रती सहानुभूती व्यक्त केली जात आहे. यातच जर्मनीच्या एका टिव्ही चॅनेलचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलिदिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) यांच्या भाषणाचा अनुवाद करणाऱ्या महिला अनुवादकाला युद्धाचे परिणाम ऐकून अक्षरशः रडू कोसळलं. याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. (Ukraine President Volodymyr Zelensky Speech Translator Sobs While Translating His Statement)

युक्रेनमधील ऑस्ट्रियाचे राजदूत अलेक्झांडर शेरबा यांनी यासंबंधी एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये जर्मनीच्या वेल्ट चॅनलसाठी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष विलिदिमिर झेलेन्स्की यांच्या भाषणाचं अनुवाद करत होती. यामध्ये अनुवादकाचा आवाज ऐकू येतो. या भाषणादरम्यान झेलेन्स्की म्हणतात की, "आमच्यासाठी परिस्थिती बिकट आहे," याचवेळी अनुवादक महिला मध्येच थांबते अन् तिला हुंदका अनावरण होतो आणि तिला अक्षरशः रडू कोसळतं. थोडं सावरल्यानंतर ती प्रेक्षकांची माफी मागत पुन्हा अनुवाद सुरु ठेवते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.