'पाकिस्तान तुमचा गुलाम आहे का?', पाश्चिमात्य देशांवर इम्रान खान भडकले!

pakistan prime minister imran khan
pakistan prime minister imran khan Team esakal
Updated on

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी संयुक्त राष्ट्र महासभेच्या मतदानात युक्रेनवर रशियाच्या अक्रमणाचा निषेध करण्यासाठी पाकिस्तानला आग्रह केला होता, ज्यामध्ये भारत, पाकिस्तान, संयुक्त अरब अमिराती हे देश सहभागी झाले नाहीत. या दबावामुळे इम्रान खान यांनी इस्लामाबादमधील पाश्चात्य देशांच्या राजदूतांना फटकारले आहे. एका सार्वजनिक रॅलीमध्ये बोलताना इम्रान खान यांनी, पाकिस्तान हा पाश्चिमात्य देशांचा गुलाम आहे का? असा थेट सवाल केलाय.

युरोपियन युनियनच्या सदस्य राष्ट्रांसह २२ राजनैतिक मिशनच्या प्रमुखांनी १ मार्च रोजी संयुक्त पत्र जारी करून युक्रेनवर रशियाच्या आक्रमणाचा निषेध करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेतील ठरावाला पाठिंबा देण्याची विनंती केली होती. त्यावर इम्रान खान म्हणाले की, “तुम्ही आम्हाला काय समजता? आम्ही तुमचे गुलाम आहोत का… तुम्ही जे बोलाल ते आम्ही करू, असं तुम्हाला वाटतं का?”, पुढे ते म्हणाले की, "मला युरोपियन युनियनच्या राजदूतांना विचारायचे आहे, तुम्ही भारताला असे पत्र लिहिले का?" असा सवालही त्यांनी केला आहे.

इम्रान खान पुढे म्हणाले की, अफगाणिस्तानातील पाश्चात्य नाटो आघाडीला पाकिस्तानने पाठिंबा दिल्याने त्याचा त्रास सहन करावा लागत आहे, आमची अमेरिका, रशिया, चीन आणि युरोपशी मैत्री आहे. आम्ही कोणत्याही गोटात नाहीत. आम्ही तटस्थ असल्याने, आम्ही युक्रेनमधील हे युद्ध संपवण्यासाठी या देशांसोबत सैन्यात सामील होऊन प्रयत्न करू त्यासोबतच सहकार्य करु.

pakistan prime minister imran khan
युक्रेनविरोधात रशियाचा नवा डाव; लढण्यासाठी सिरियन सैनिकांना देणार 300 डॉलर

1 मार्च रोजी, जर्मनी आणि फ्रान्ससह पाकिस्तानमधील विविध विदेशी मिशनच्या प्रमुखांनी 25 फेब्रुवारीच्या UNSC ठरावाची आठवण करून देणारे संयुक्त पत्र लिहिले. काही तज्ञांच्या मते असे पत्र सार्वजनिकपणे पाठवणे हे दुर्मिळ बाब होती. दरम्यान पाकिस्तानला युरोपियन युनियनच्या प्रतिनिधी मंडळाचे प्रमुख म्हणाले की, या ठरावाचा उद्देश आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त सीमांमध्ये सार्वभौमत्व, स्वातंत्र्य, एकता आणि प्रादेशिक अखंडतेसाठी युक्रेनच्या वचनबद्धतेची सिध्द करणे हा आहे. युक्रेनवर रशियाच्या आक्रमकतेचा तीव्र निषेध करण्याचाही हेतू होता.

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर विशेष लष्करी कारवाईला मंजुरी दिली तेव्हा इम्रान खान मॉस्कोच्या दौऱ्यावर होते, ज्यावर बरीच टीका झाली होती. यानंतर पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र महासभेच्या ठरावावर मतदान करणे टाळले.

pakistan prime minister imran khan
नारायण राणेंच्या अडचणी संपेनात, आता BMC ने पाठवली कारणे दाखवा नोटीस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.