Russia Ukraine War : गेल्या आठ दिवसांपासून रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये युद्ध सुरु आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची सुटका भारत सरकारच्या 'ऑपरेशन गंगा'अंतर्गत करण्यात येत आहे. तसेच दुसऱ्या बाजूला या दोन्ही देशांमध्ये शांतता चर्चा देखील सुरु झाली असून त्या चर्चेची दुसरी फेरी नुकतीच पार पडली आहे. आज शुक्रवारी दिवसभरात काय काय घडतंय, त्या सगळ्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स वाचा फक्त 'सकाळ'वर... (Russia-Ukraine crisis Live)
भारताने संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेच चौथ्यांदा रशियाविरोधात तटस्थ भूमिका घेतली आहे. युक्रेनवरील रशियाच्या लष्करी कारवाईवर तपासाच्या प्रस्तावावर मतदान घेण्यात आलं होतं. यामध्येही भारताने तटस्थ भूमिका घेतली. तर युएनएचआरसीने रशियाच्या लष्करी हल्ल्यावर एक स्वतंत्र आंतरराष्ट्रीय तपास आयोग स्थापन करण्याचा निर्णय़ घेतला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी युक्रेनमधील युद्ध सुरु असलेल्या भागात अडकलेल्या विद्यार्थ्यांबद्दल चिंता व्यक्त केली. त्यावर केंद्राने सांगितलं की सरकारच्या प्रयत्नांमुळे 17,000 लोकांना सुरक्षित स्थळी हालवण्यात आलं आहे.
युक्रेनमध्ये अणुउर्जा प्रकल्पावर हल्ला आणि रशियन सैन्याने ताबा मिळवल्यानंतर युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी रशियावर आणखी कडक निर्बंध घालण्याची मागणी केली आहे.
रशियन सैन्याने युक्रेनमधील आणखी एका शहरात प्रवेश केला आहे. मायकोलेव या शहरात सध्या युद्ध सुरु असल्याची माहिती गव्हर्नरने दिली आहे.
रशियाने युक्रेनमधील न्यूक्लिअर पॉवर प्लांटवर हल्ला केला. यामध्ये युक्रेनच्या तीन जवानांचा मृत्यू झाला.
रशियन सैन्याने युक्रेनच्या झापोरिझ्झिया अणुऊर्जा प्रकल्प घेतलं ताब्यात - रॉयटर्स
रशियन फौजांनी युक्रेनच्या न्यूक्लिअर पॉवर स्टेशनमध्ये प्रवेश केला आहे. - एएफपी न्यूज एजन्सी
युक्रेनच्या खार्किव आणि सुमी या शहरातून भारतीय विद्यार्थी आणि इतर परदेशी लोकांना रशियाच्या बेल्गोरोड प्रदेशात नेण्यासाठी 130 रशियन बसेस तयार आहेत, अशी माहिती रशियाचे राष्ट्रीय संरक्षण नियंत्रण केंद्राचे प्रमुख कर्नल जनरल मिखाईल मिझिनत्सेव्ह यांनी गुरुवारी दिली आहे: रशियन न्यूज एजन्सी TASS
युक्रेनशी संबंधित परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
युक्रेनच्या आपत्कालीन सेवेनं आता माहिती दिली आहे की, झापोरिझ्झिया न्यूक्लियर पॉवर स्टेशनजवळ आग विझवण्यात आली आहे: रॉयटर्स
ऑपरेशन गंगा मोहिमेअंतर्गत आणखी तीन IAF C-17 विमाने काल रात्री उशिरा आणि आज पहाटे हिंडन एअरबेसवर परतली आहेत. यामधून युद्धग्रस्त युक्रेन देशातून 630 भारतीय नागरिकांना आणण्यात आलं आहे. : भारतीय हवाई दल
ब्रिटनचे पंतप्रधान जॉन्सन यांनी आज पहाटे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी संवाद साधला. पीएम जॉन्सन म्हणाले की, अध्यक्ष पुतिन यांच्या बेपर्वाईच्या कृतींमुळे आता संपूर्ण युरोपच्या सुरक्षिततेला थेट धोका निर्माण होऊ शकतो. परिस्थिती आणखी बिघडू नये यासाठी यूके सर्वतोपरी प्रयत्न करेल, असं आश्वासन त्यांनी दिलं आहे.
युक्रेनमधील झापोरिझ्झिया अणुऊर्जा प्रकल्पावर झालेल्या गोळीबारावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी रशियाचे व्लादिमीर पुतीन यांच्याशी चर्चा केली आहे, अशी बातमी एएफपी या वृत्तसंस्थेने दिली.
युक्रेनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी म्हटलंय की, "युरोपमधील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्प झापोरिझ्झिया न्यूक्लिअर पॉवर प्लांटवर रशियन सैन्य चारही बाजूंनी गोळीबार करत आहे. आग आधीच भडकली आहे. जर तो उडाला तर तो चेरनोबिलपेक्षा 10 पट मोठा असेल!"
युक्रेन राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाचे प्रमुख सल्लागार यांनी "झापोरिझ्झिया एनपीपी अंडर फायर..." असं म्हणत एक व्हिडीओ ट्विट केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.