अण्वस्त्रसदृश्य क्षेपणास्त्र हल्ल्यांचा सराव केला, युद्धादरम्यान रशियाचं मोठं वक्तव्य

Russia Pracised Nuclear Weapon
Russia Pracised Nuclear WeaponSakal
Updated on

मॉस्को : सध्या युक्रेन-रशिया युद्ध (Ukraine Russia War) सुरूच आहे. यादरम्यान रशियाने अण्वस्त्रांबद्दल (Nuclear Weapons) एक मोठं विधान केलं आहे. सैन्याने कॅलिनिनग्राडच्या पश्चिमेकडील एन्क्लेव्हमध्ये अण्वस्त्रसदृश्य क्षेपणास्त्र हल्ल्यांचा सराव केला होता, असं रशियाकडून सांगण्यात आलं आहे.

Russia Pracised Nuclear Weapon
युक्रेन-रशिया युद्धात कोणीही जिंकणार नाही, PM मोदींचं जर्मनीत वक्तव्य

रशियाने युक्रेनवर हल्ला (Ukraine Russia War) केला. यामध्ये १३ दशलक्षातून अधिक नागरिकांनी देश सोडला. हजारो नागरिक मारले गेले. या युद्धाच्या ७० व्या दिवशी रशियाने ही घोषणा केली आहे. युरोपियन युनियन सदस्य पोलंड आणि लिथुआनिया यांच्यातील बाल्टिक समुद्रावरील एन्क्लेव्हमध्ये बुधवारी झालेल्या युद्ध खेळांमध्ये रशियाने अण्वस्त्र सदृश्य इस्कंदर मोबाइल बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रणालीच्या इलेक्ट्रॉनिक प्रक्षेपणाचा सराव केला, असे संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे. रशियन सैन्याने क्षेपणास्त्र प्रणाली, एअरफील्ड, संरक्षित पायाभूत सुविधा, लष्करी उपकरणे आणि शत्रूच्या कमांड लाँचर्सचे अनुकरण करून लक्ष्यांच्या अनुषंगाने हा सराव केल्याचे यामध्ये म्हटलं आहे. इतकेच नाहीतर सैन्याने किरोत्सर्जन आणि रासायनिक धुलीकणांमध्ये देखील सराव केला. या सरावावेळी १०० हू अधिक सैन्याचा सहभाग होता.

रशियाने फेब्रुवारी महिन्यात युक्रेनवर हल्ला केला. त्यानंतर युक्रेनचे अनेक शहरं उद्ध्वस्त झाली. हजारो नागरिक मारले गेले. युद्धाच्या सुरुवातीला रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी अण्वस्त्र हायअलर्ट ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे रशिया युक्रेनवर अणूहल्ला करणार का? अशी भीती व्यक्त केली जात होती. रशियाच्या अस्तित्वाला धोका असेल तर रशिया अण्वस्त्राचा वापर करेल, असं क्रेमलिनने म्हटलं होतं. आता रशियाने अण्वस्त्राचा सराव केल्याचं त्यांच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितलं आहे. त्यामुळे रशिया युक्रेनवर अण्वस्त्राचा वापर करेल का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.