युक्रेनसाठी 'फ्री कॉलिंग'; व्होडाफोनसह डझनहून अधिक कंपन्यांची घोषणा

Ukraine Russia war vodafone at and t deutsche telekom free call roaming charge free sim in Ukraine rak94
Ukraine Russia war vodafone at and t deutsche telekom free call roaming charge free sim in Ukraine rak94Google
Updated on

Ukraine Russia war : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युध्दाकडे सगळ्या जगाचे लक्ष लागले आहे. या युध्दात भारताचे हजारो नागरिक हे युक्रेनमध्ये अडकले आहेत. यादरम्यान युक्रेनच्या मदतीला अनेक टेलिकॉम कंपन्या धावून आल्या आहेत. ज्यापैकी ड्यूश टेलिकॉम, एटी अँड टी आणि व्होडाफोनसह डझनहून अधिक टेलिकॉम कंपन्यांनी युक्रेनमध्ये फ्री आंतरराष्ट्रीय कॉलची (International Calls) घोषणा केली आहे. या कंपन्यांनी रोमिंग (roaming charge) शुल्कही रद्द केले आहे.

युरोपियन टेलिकम्युनिकेशन लॉबिंग ग्रुप ETNO ने सांगितले की, अंतर्गत सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की युक्रेनवर रशियाच्या हल्ल्यानंतर त्याचे किमान 13 सदस्य युक्रेनियन लोकांना मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. आगामी काळात इतर कंपन्या आणि संस्थांकडूनही अशीच अपेक्षा आहे. युक्रेनमधील मोफत आंतरराष्ट्रीय कॉल्स व्यतिरिक्त रोमिंग शुल्क रद्द करणाऱ्या दूरसंचार कंपन्यांमध्ये ड्यूश टेलिकॉम, ऑरेंज, टेलिफोनिका, टेलिया कंपनी, ए1 टेलिकॉम ऑस्ट्रिया ग्रुप, टेलिनॉर, प्रॉक्सिमस, केपीएन, व्होडाफोन, विवाकॉम, टीआयएम टेलिकॉम इटालिया, अल्टीस पोर्तुगाल आणि स्विसकॉम यांचा समावेश आहे. .

Ukraine Russia war vodafone at and t deutsche telekom free call roaming charge free sim in Ukraine rak94
'मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांच्या दबावापुढे झुकू नये' - आशिष शेलार

यातील अनेक कंपन्या शेजारील देशांतील निर्वासितांना मोफत सिमकार्ड देत आहेत. याशिवाय निर्वासित शिबिरांमध्ये मोफत वाय-फाय आणि एसएमएस डोनेशन देखील सुरू आहे. गेल्या आठवड्यात, यूएस टेलिकॉम समूह AT&T ने सांगितले होते की त्यांच्या यूएस ग्राहक आणि व्यावसायिक ग्राहकांना 7 मार्चपर्यंत युक्रेनमध्ये अमर्यादित लॉंग डिस्टंस कॉलिंग मिळेल.

Verizon ने सांगितले की ते 10 मार्चपर्यंत लँडलाइन आणि वापरकर्ते किंवा व्यवसायिक वायरलेस फोनवरून आणि युक्रेनमधील कॉलसाठी शुल्क माफ करत आहेत. Verizon ने युक्रेनमधील ग्राहकांसाठी व्हॉइस आणि टेक्स्ट रोमिंग शुल्क देखील काढून टाकले आहे.

Ukraine Russia war vodafone at and t deutsche telekom free call roaming charge free sim in Ukraine rak94
LPG Price : LPG सिलिंडर आजपासून महाग, द्यावे लागणार 105 रुपये जास्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.