Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेन यांच्यातील भीषण युद्धाला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे.
हेही वाचा : जाणून घ्या काॅन्ट्रा फंडातल्या गुंतवणुकीबाबत
गेल्या वर्षी 24 फेब्रुवारी 2022 रोजी रशियन सैन्याने युक्रेनवर तीन बाजूंनी जोरदार हल्ला केला होता. युक्रेनची राजधानी कीव्हवर ताबा मिळवून झेलेन्स्कीची सत्ता उलथून टाकण्याचा रशियाचा प्रयत्न होता.
यासाठी रशियाने लाखो सैनिक तैनात केले. याशिवाय चारही बाजूंनी युक्रेनवर क्षेपणास्त्रांचा वर्षाव करून अनेक शहरं उद्ध्वस्त केली.
मात्र, असे असतानदेखील रशियाला अद्यापपर्यंत युक्रेनवर ताबा मिळवता आलेला नाही. या युद्धात आतापर्यंत 3 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून 63 लाख लोक बेघर झाले आहेत.
अमेरिकेच्या न्यूजवीक नियतकालिकाने दिलेल्या वृत्तानुसार, या युद्धात पुतिन यांच्या सैन्याला 1 वर्षात 9 ट्रिलियन डॉलर्सचे मोठे नुकसान झाले आहे. पाकिस्तानच्या एकूण 3 अब्ज डॉलरच्या परकीय चलनाच्या साठ्यापेक्षा हे प्रमाण 3000 पट जास्त आहे.
याशिवाय या युद्धात रशियन सैन्याची 300 लढाऊ विमाने आणि 6300 हून अधिक सशस्त्र वाहने नष्ट झाली आहेत. तर, 130,000 हून अधिक रशियन सैनिक मारले गेल्याचे युक्रेननं म्हटले आहे. एवढे नुकसान होऊनही पुतिन यांनी युक्रेनमधील युद्ध सुरूच ठेवण्याची शपथ घेतली आहे.
युक्रेन युद्धावरील रशियाचा खर्चाने आता 9 ट्रिलियनचा आकडा ओलांडला असल्याचा अंदाज अमेरिकेतील विल्सन सेंटरमधील रशियन अर्थव्यवस्थेचे तज्ज्ञ बोरिस ग्रोझोव्स्की यांनी व्यक्त केला आहे.
बोरिस म्हणाले की, 2022 सालासाठी रशियन सरकारची एकूण खर्च योजना 346 अब्ज डॉलर होती, ज्यापैकी 46 अब्ज डॉलर सैन्यावर आणि 36.9 अब्ज डॉलर पोलीस आणि फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसवर खर्च करायचे होते. मात्र, पोलीस आणि एफएसबीचे पैसेही लष्कराला दिले जात असल्याचे ते म्हणाले.
रशिया युद्धावर 50 टक्के अधिक खर्च करत असल्याचा अंदाजही बोरिस यांनी व्यक्त केला आहे. याशिवाय युक्रेनमध्ये जखमी सैनिकांवरील उपचारांचा खर्च यामध्ये जोडल्यास युद्धाचा एकूण खर्च 15 ट्रिलियनपर्यंत पोहचू शकतो. मात्र, काही तज्ज्ञ बोरिस यांच्या अंदाजापेक्षा जास्त फटका रशियाला बसला आहे.
रशिया युक्रेन युद्धासाठी दररोज 900 दशलक्ष डॉलर खर्च करत आहे. युक्रेन युद्धात रशियाने आतापर्यंत निम्मे रणगाडे गमावल्याचा अंदाजही व्यक्त केला जात आहे.
तसेच 1,769 लढाऊ वाहनं नष्ट झाल्याचे सांगितले जात आहे. युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयानुसार, गेल्या वर्षभरात 1,30,000 रशियन सैनिक मारले गेले आहेत. याशिवाय 6300 युद्ध वाहने आणि 300 लढाऊ विमाने नष्ट करण्यात आली आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.