बाकू (अझरबैजान) : येथील संयुक्त राष्ट्रांची हवामानबदलविषयक परिषद अखेरच्या टप्प्यात आली असताना वैश्विक तापमानवाढ रोखण्यासाठी श्रीमंत देशांनी विकसनशील देशांना नेमकी किती आर्थिक मदत करावी याबाबतचा आराखडा अद्याप निश्चित होऊ शकलेला नाही. चर्चेच्या पातळीवर देखील उदासीनता दिसू लागल्याने पर्यावरणविषयक हक्कांसाठी लढणाऱ्या संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. आता या संघटना संमेलनस्थळाच्या बाहेरच मोठे आंदोलन करण्याच्या विचारात आहेत.