Gaza Ceasefire: संयुक्त राष्ट्रात गाझातील युद्धविरामासाठी प्रस्ताव मंजूर; अमेरिका एकट्याने घेतली वेगळी भूमिका!

UN Security Council: संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत महत्त्वाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. या प्रस्तावाअंतर्गत गाझामध्ये तात्काळ युद्धविराम करावा यावर एकमत झालं आहे
Gaza
Gaza
Updated on

नवी दिल्ली- संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत महत्त्वाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. या प्रस्तावाअंतर्गत गाझामध्ये तात्काळ युद्धविराम करावा यावर एकमत झालं आहे. विशेष म्हणजे मुस्लिमांचा पवित्र महिना रमजानमध्ये हा प्रस्ताव मान्य झाला असल्याने रमजान गाझामध्ये शांतता आणणार का? हे पाहावं लागणार आहे.(UN Security Council passes resolution demanding immediate Gaza ceasefire)

गेल्या पाच महिन्यांपासून सुरक्षा परिषदमध्ये असा प्रस्ताव मंजूर करण्याचा प्रयत्न सुरु होता. अखेर हा प्रस्ताव मान्य झाला आहे. युनायटेड नेशन्स सेक्युरिटी काऊन्सिलचे महासचिव एंटानिओ गुटेरेस यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. ते म्हणालेत की, सुरक्षा परिषदेमध्ये बहुप्रतिक्षित असलेला प्रस्ताव मंजूर झाला. त्यामुळे आता गाझामध्ये युद्धविराम होईल अशी आशा आहे. शिवाय, कोणत्याही अटींशिवाय सर्व अपहृतांची सुटका व्हावी.

Gaza
Farooq Abdullah: काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानशी बोला अन्यथा येथेही गाझा; फारुख अब्दुल्ला यांचा इशारा

अमेरिकेची वेगळी भूमिका

महत्त्वाचं म्हणजे अमेरिका या प्रस्तावावरील मतदानावेळी अनुपस्थित राहिला. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या महत्त्वाच्या बैठकीत १५ सदस्यांपैकी १४ देशांनी प्रस्तावाच्या बाजुने मतदान केले आहे. गाझातीत युद्धविरामाचा प्रस्ताव दहा देशांनी समोर आणला होता. प्रस्तावामध्ये रमजानच्या महिन्यामध्ये युद्धविरामाची मागणी करण्यात आली आहे. रमजानचा महिना १० मार्चपासून सुरु झाला आहे. सर्व अपहृतांना तात्काळ कोणत्याही अटींशिवाय मुक्त करण्यात यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

पाच महिन्यांमध्ये पहिल्यांदा संयुक्त राष्ट्राने स्पष्टपणे युद्धबंदीचे आवाहन केले आहे. प्रस्ताव मंजूर झाला असला तरी इस्राइल याचे पालन करणार का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. ७ ऑक्टोंबर रोजी हमास दहशतवाद्यांनी इस्राइलवर हल्ला केला होता. त्यानंतर इस्राइलकडून प्रत्युत्तर देणे सुरु झाले. संघर्ष तीव्र झाला तसा गाझामध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकांचे अन्न-पाण्याविना हाल होत आहेत. लवकर युद्धविराम झाला नाही तर गाझा पूर्णपणे बेचिराख होण्याची शक्यता आहे.

Gaza
Lebanon Attack on Israel: हमास पाठोपाठ लेबनॉनचाही इस्राइलवर हल्ला! एका भारतीयाचा मृत्यू, तर दोन जण जखमी

युएनच्या प्रस्तावामध्ये हमासपेक्षा गाझातील सर्वसामान्य नागरिकांचा उल्लेख करण्यात आला आहे. प्रस्तावामध्ये उल्लेख करण्यात आला आहे की, नागरिकांचे अपहरण करणे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी अनेक इस्राइली नागरिकांचे अपहरण केले आहे. त्यांना सोडण्याची मागणी होत आहे. सध्याच्या माहितीनुसार, इस्राइल-हमास युद्धामध्ये आतापर्यंत ३७ हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()