बेरोजगार पतीचा कारनामा! पैशांसाठी पत्नीचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ विकले अन्...या एका चुकीने सापडला

Unemployed husband used to sell his wife photo video to earn money: चार वर्षांपूर्वी तिचे लग्न झाले आहे. त्यांना एक मुल देखील आहे. महिलेच्या दाव्यानुसार, पतीने काही महिन्यापूर्वी नोकरी सोडली होती. त्याला काम करण्यात रस राहिला नव्हता.
mobile watching
mobile watchingeSakal
Updated on

नवी दिल्ली- नोकरी सोडून घरी बसलेल्या एका पतीने धक्कादायक कृती केली आहे. पतीने स्वत:च्या पत्नीसोबतच मोठा विश्वासघात केला आहे. पत्नीचे नग्न फोटो पती पैशांसाठी बाहेर विकत होता. पत्नीला जेव्हा हे कळालं तेव्हा तिच्या पायाखालची जमिनीच सरकली. महिलेने यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट करून माहिती दिली आहे. तिने याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली नाही.

मिडिया रिपोर्टनुसार, मलेशियात राहणाऱ्या एका महिलेने याबाबत सोशल मीडियावर हकीकत सांगितली आहे. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने यासंदर्भातील बातमी दिली आहे. महिलेने पोस्टमध्ये म्हटलंय की, चार वर्षांपूर्वी तिचे लग्न झाले आहे. त्यांना एक मुल देखील आहे. महिलेच्या दाव्यानुसार, पतीने काही महिन्यापूर्वी नोकरी सोडली होती. त्याला काम करण्यात रस राहिला नव्हता.

mobile watching
Youtube Viral : तुमचे युट्युब व्हिडिओ व्हायरल होत नाहीयेत? फक्त 'हे' सोपे बदल तुम्हाला मिळवून देतील लाखो व्ह्युज अन् फॉलोअर्स

पत्नीने मोठ्या मनाने पतीला घरीच थांबण्यास सांगितलं. त्यांच्याकडे काही ठेवी होत्या, शिवाय पत्नी नोकरी करत होती. पती आता बेरोजगार झाला होता. पण, पत्नी सर्व प्रकारे मदत करत होती. एक महिन्यापूर्वी पतीकडे काही पैसे आले होते. काहीतरी काम केल्याने पैसे मिळाले असतील असा पत्नीला समज झाला होता.

एकदा नकळत पत्नीने पतीचा मोबाईल फोन तपासला. त्यावेळी तिला धक्का बसला. यामध्ये तिचे नग्न फोटो आणि व्हिडिओ काढण्यात आले होते. इतकेच नाही तर ते एकाला पाठवण्यात आले होते. पत्नीच्या परवानगीनेच हे फोटो आणि व्हिडिओ घेण्यात आले होते. पण, ते दुसऱ्याला शेअर करण्याचं काहीही ठरलं नव्हतं. पत्नीने याबाबत जेव्हा पतीला विचारणा केली तेव्हा त्याने असं काही केल्याचं साफ नाकारलं. शिवाय, मोबाईलमधील फोटो आणि व्हिडिओ डिलिट करून टाकले.

mobile watching
Supla shot viral video: काकूंनी पदर खोचून ठोकला दणदणीत सुपला शॉट ! सूर्याची 'लाडकी बहीण' राजगुरूनगरमध्ये?

पुरावे गोळा करण्यासाठी महिला काही दिवस शांत राहिली. कसल्याची प्रकारचं भांडण केलं नाही. पण, यापुढे तिने पतीला तिचे नग्न फोटो काढू दिले नाहीत. त्यानंतर मात्र पती टेंशनमध्ये आला. त्याने पत्नीसमोर आपला गुन्हा कबुल केला. पैशाची आवश्यकता असल्याने असं केल्याचं त्याने सांगितलं. दरम्यान, महिलेने पतीपासून घटस्फोट घ्यावा आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात द्यावं अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावरून व्यक्त केली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com