United Kingdom Elections : कामगाराचा मुलगा ते पंतप्रधान

ब्रिटनच्या संसदीय निवडणुकीत तब्बल १४ वर्षांनंतर सत्तांतर झाले असून ऋषी सुनक यांच्या नेतृत्वाखालील हुजूर पक्षाला (कंझर्व्हेटिव्ह पार्टी) कीर स्टार्मर यांच्या नेतृत्वाखालील मजूर पक्षाने (लेबर पार्टी) धूळ चारत सत्तासिंहासन प्राप्त केले आहे.
United Kingdom Elections
United Kingdom Electionssakal
Updated on

ब्रिटनच्या संसदीय निवडणुकीत तब्बल १४ वर्षांनंतर सत्तांतर झाले असून ऋषी सुनक यांच्या नेतृत्वाखालील हुजूर पक्षाला (कंझर्व्हेटिव्ह पार्टी) कीर स्टार्मर यांच्या नेतृत्वाखालील मजूर पक्षाने (लेबर पार्टी) धूळ चारत सत्तासिंहासन प्राप्त केले आहे. स्टार्मर हे उत्तर लंडन या मतदारसंघातून पुन्हा विजयी झाले आहेत. ब्रिटिश राष्ट्राच्या पुनरुज्जीवनाचे आवाहन करत स्टार्मर यांनी बदलाची हाक दिली होती. कीर स्टार्मर यांचा जन्म १९६२ मध्ये लंडन शहरात झाला होता पण त्यांचे सारे बालपण हे ऑक्सटेडमधील सुर्रे येथे गेले. त्यांचे वडील हे साधे कामगार होते तर आई एका रुग्णालयामध्ये परिचारिका म्हणून काम करत होती. कीर स्टार्मर हे तरुण वयापासून राजकारणात सक्रिय होते.

समाजवादी विचारधारेचा प्रभाव असल्याने त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी लेबर पक्षात प्रवेश केला होता. कीर स्टार्मर यांना शिक्षणामध्ये विशेष गती होती. लीड्स विद्यापीठातून त्यांनी कायदे शाखेची पदवी घेतली तर प्रसिद्ध ऑक्सफर्ड विद्यापीठातून त्यांनी नागरी कायद्याबाबत पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतले.

प्रत्यक्ष वकील म्हणून काम करत असताना त्यांनी मानवी हक्काचा हिरीरीने पुरस्कार केला. उत्तर आयर्लंड नियोजन मंडळाचे मानवी हक्क सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केले. त्यांची २००२ मध्ये राणीच्या परिषदेमध्ये नियुक्ती करण्यात आली होती.

ते २००८ ते २०१३ या काळामध्ये जनसुनावणी विभागाचे संचालक होते. याकाळात त्यांनी स्टीफन लॉरेन्स खुनासारखी अनेक हायप्रोफाईल प्रकरणे हाताळली. ते २०१५ मध्ये हॉलबॉर्न आणि सेंट पॅनक्रास येथून हाउस कॉमन्सचे सदस्य म्हणून निवडून आले. हे दोन्ही मतदारसंघ मजूर पक्षाचे बालेकिल्ले म्हणून ओळखले जातात.

या धोरणाचा पुरस्कार

  • आर्थिक स्थैर्य अन् वृद्धी

  • आरोग्य सेवेतील सुधारणा

  • सीमा सुरक्षेवर भर

  • ऊर्जा पुरवठ्याचे राष्ट्रीयीकरण

  • समाजविरोधी घटकांना पायबंद

  • शिक्षकांची भरती

  • भारताशी मैत्रीवर भर, मुक्त व्यापाराचा पुरस्कार

  • इस्राईलला शस्त्रे देण्यास विरोध, पॅलेस्टाईनला पाठिंबा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.