दररोज 25 हजार लोकांचा भूकेमुळं मृत्यू; UN अहवालातून धक्कादायक खुलासा

संपूर्ण जगभरात भूकबळी हा चिंतेचा विषय असून, यावर अनेक उपाय योजना करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहे.
UN
UNSakal
Updated on

UN Report : संपूर्ण जगभरात भूकबळी (Hunger Death) हा चिंतेचा विषय असून, यावर अनेक उपाय योजना करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, त्यानंतरही भूकबळीने मृत्यू होणाऱ्यांची संख्या काही केल्या कमी होत नाहीये. या सर्वामध्ये संयुक्त राष्ट्रांनी (UN) जारी केलेल्या अहवालातून धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. यामध्ये जगभरात उपासमारी आणि संबंधित कारणांमुळे दररोज 25 हजार लोकांचा मृत्यू होत असल्याचे नमुद करण्यात आले आहे. यामध्ये सर्वात चिंतेची बाब म्हणचे यामध्ये सर्वाधिक संख्या ही लहान मुलांची आहे. (UN Hunger Report News)

UN
भाजपने पहिला डाव टाकला... राज्यपालांना पत्र पाठवलं

यूएनच्या अहवालात (United Nation) असे म्हटले आहे की, दररोज दहा हजार मुलांना भुकेमुळे आपला जीव गमावावा लागत आहे. त्याचवेळी जगभरात सुमारे 854 दशलक्ष लोक कुपोषित असल्याचा अंदाज या अहवालात नमुद करण्यात आले आहे. यामध्ये खाद्यपदार्थांच्या झपाट्याने वाढणाऱ्या किमतींमुळे हा आकडा लवकरच १०० दशलक्षांपर्यंत पोहोचेल असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. शहरी गरीब, विस्थापित लोकसंख्या, ग्रामीण भूमिहीन यासह बहुतांश लहान शेतकरी कुपोषित होण्याचा सर्वाधिक धोका यामुळे वाढण्याची भीतीही यामध्ये व्यक्त करण्यात आली आहे.

UN
Maharashtra Politics LIVE: "मी मुख्यमंत्रीपद उपभोगलंच नाही"-CM ठाकरे

उपासमारीच्या या संकटाबाबत संयुक्त राष्ट्रसंघाने दावा केला आहे की, गेल्या दोन दशकांमध्ये लोकसंख्या वाढ, उत्पन्नात सुधारणा आणि आहारातील वैविध्य यामुळे अन्नाच्या मागणीत सातत्याने वाढ झाली आहे. अहवालात अन्नधान्याच्या किमती वाढण्यामागील आणखी एक कारण म्हणजे शेतजमिनीचे अकृषिक वापरात रुपांतर करण्याची स्पर्धा शहरीकरणाला कारणीभूत असल्याचे सांगण्यात आले आहे.

UN
...तर देशात भूकबळी अन् बेरोजगारी वाढेल

संयुक्त राष्ट्रांचा तात्काळ कारवाईवर भर

यूएनने आपल्या नवीन अहवालात जागतिक अन्न संकटावर चिंता व्यक्त केली आहे. हा अहवाल देश आणि प्रदेशांवर केंद्रित आहे. जेथे अन्न संकटाची तीव्रता स्थानिक संसाधने आणि क्षमतांपेक्षा जास्त आहे. गेल्या दोन वर्षांत कोरोना महामारीमुळे लोकांच्या कामावर परिणाम झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जगभरात लाखो लोक बेरोजगारीचे बळी ठरले आहेत. अशा परिस्थितीत या लोकांना वाचवण्यासाठी आणि उपासमारीने होणारे मृत्यू टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे अहवालाता स्पष्ट करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.